Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरणअन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षणशिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेशमहिला शेतीकामात होत्या तोपर्यंत आजारांच्या समस्या कमी होत्या

जाहिरात

 

सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी

schedule27 Mar 26 person by visibility 125 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली झाली.त्यांच्या जागी धाराशिवे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता घोष हे सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी असणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत. अशोक काकडे हे फेब्रुवारी 2025 पासून सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. त्यापूर्वी त्यांनी सारथीचे व्यवस्थापकी संचालक म्हणूनही काम केले आहे. दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने 27 मार्च 2026 रोजी बदलीचे आदेश काढलेले आहेत. सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. घोष यांची नियुक्ती झाली आहे. घोष हे 2019 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ व धाराशिव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. ते मूळचे कलकत्ता येथील आहेत. बायोकेमिस्ट्री मधून त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून  पीएचडी प्राप्त केले आहे. घोष यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर धाराशिव  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. प्रियवंदा महाडदळकर यांची नियुक्ती झाली आहे. तर काकडे यांची बदली मुंबईतील कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. काकडे हे 2010 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes