Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
यशस्वितेचा षटकार ! महाराष्ट्र न्यूज वनचे सातव्या वर्षात पदार्पण ! !सहकार गौरव पुरस्कार सोहळा; आमदार विनय कोरे यांना सहकार भूषण पुरस्कार ! विद्याधर अनास्कर ठरले सहकार महर्षी !!ब्राह्मण समाजाला सरकारकडून घोषणांची नव्हे, उत्तरदायित्वाची गरज ! गोलमेज परिषदेत राज्यव्यापी कृती समितीची स्थापना ! !न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्रफार्मसीच्या विद्यार्थ्याला 38 लाखाचे पॅकेज, संजय घोडावतनी केले अभिनंदनअरुंधती महाडिक बनल्या लेखिका ! उलगडला नाईक -निंबाळकर घराण्याचा इतिहास, शाही पाककलांचा स्वाद !!वारणा विद्यापीठ करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची देवाणघेवाणशिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या बदल्या, काही जणांचा एकाच ठिकाणचा मुक्काम हललाप्रा. श्वेता परुळेकर यांना पीएचडीनऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जाहिरात

 

वारणा विद्यापीठ करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची देवाणघेवाण

schedule04 Jul 26 person by visibility 28 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : झांबियाच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्ती क्षेत्रातील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाने वारणा विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे भारत आणि झांबिया यांच्यातील शैक्षणिक, संशोधन विद्यार्थी देवाणघेवाण क्षेत्रातील सहकार्याला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

झांबियाच्या उच्च शिक्षण कर्ज शिष्यवृत्ती मंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॉन मचायी, शिष्यवृत्ती विभागाचे व्यवस्थापक श्री. फ्लेमिंग मुकोशा तसेच स्कायगोल्ड शैक्षणिक सल्लागार संस्था चे व्यवस्थापकीय संचालक प्राईड एम. सिंकाला यांचा प्रतिनिधी मंडळात समावेश होता.याप्रसंगी आयोजित संवाद सत्रात विद्यापीठातील शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन उपक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध अत्याधुनिक सुविधा यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रतिनिधी मंडळाने विद्यापीठ परिसरातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, ग्रंथालय, स्मार्ट क्लासरूम्स (सुसज्ज डिजिटल वर्गखोल्या) तसेच विविध शैक्षणिक संशोधन सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, तंत्रज्ञानाधारित शिक्षण व्यवस्था आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात झांबियातील विद्यार्थ्यांना वारणा विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

या प्रसंगी वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिनी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटीलडॉ. एस. एम. पिसे, डॉ  कल्पना पाटील विविध संकुलांचे अधिष्ठाता ॲडमिशन इन्चार्ज, डॉ अमोल पाटील, डॉ. उमेश देशांनवर, प्रा. राहुल कुंभार उपस्थित होते. वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे,  कुलाधिकारी एन. एच. पाटील यांनी प्रतिनिधी मंडळाच्या भेटीबद्दल शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes