प्रा. श्वेता परुळेकर यांना पीएचडी
schedule04 Jul 26 person by visibility 37 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील अधिसभा सदस्य व महावीर महाविद्यालयातील प्रा. श्वेता शिवाजीराव परुळेकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली. परुळेकर यांनी, ‘महाराष्ट्र – कर्नटक सीमाभागातील मराठी बोलीचा वर्णनात्मक अभ्यास’या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना कुटुबियांचे प्रोत्साहन लाभले. अॅड. के. ए. कापसे, डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. राजन गवस, डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. गोमटेश्वर पाटील, शशिकांत साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.