Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
यशस्वितेचा षटकार ! महाराष्ट्र न्यूज वनचे सातव्या वर्षात पदार्पण ! !सहकार गौरव पुरस्कार सोहळा; आमदार विनय कोरे यांना सहकार भूषण पुरस्कार ! विद्याधर अनास्कर ठरले सहकार महर्षी !!ब्राह्मण समाजाला सरकारकडून घोषणांची नव्हे, उत्तरदायित्वाची गरज ! गोलमेज परिषदेत राज्यव्यापी कृती समितीची स्थापना ! !न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्रफार्मसीच्या विद्यार्थ्याला 38 लाखाचे पॅकेज, संजय घोडावतनी केले अभिनंदनअरुंधती महाडिक बनल्या लेखिका ! उलगडला नाईक -निंबाळकर घराण्याचा इतिहास, शाही पाककलांचा स्वाद !!वारणा विद्यापीठ करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची देवाणघेवाणशिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या बदल्या, काही जणांचा एकाच ठिकाणचा मुक्काम हललाप्रा. श्वेता परुळेकर यांना पीएचडीनऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जाहिरात

 

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र

schedule04 Jul 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगाव येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाजी पेठ येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन ऑनलाईन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, तसेच प्रवेश संदर्भातील सर्व मदत विद्यार्थ्यांना केली जाणार आहे. ही सुविधा पूर्णपणे निःशुल्क असून प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहे. सोबत प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी देखील मार्गदर्शन व मदत उपलब्ध केलेली आहे.
डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांच्या अर्ज, कागदपत्रे पडताळणी व पुष्टीकरणाची प्रक्रियाही अधिकृत सुविधा केंद्रावर केली जाणार आहे. दि. १७ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी व १८ ते २० जुलै पर्यंत हरकती नोंदवणे व २१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.प्रवेश प्रक्रियेबाबत तांत्रिक अडचणी, प्रवेश फेऱ्यांबाबत सर्व माहिती मार्गदर्शन येथे केले जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, योग्य मार्गदर्शन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होणे हा सुविधा केंद्राचा मुख्य उद्देश आहे. डी फार्मसी प्रवेशासाठी प्रवेशइच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes