Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑलसमग्र शिक्षा संघर्ष समितीच्या मुंबई येथील आंदोलनास यशडीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीवार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

शिक्षण विभागातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर - सांगलीतील अधिकाऱ्यांचा समावेश

schedule01 Jul 26 person by visibility 368 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने  शिक्षण विभागातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अनुराधा शिवाजी म्हेत्रे यांची सांगली जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली.

सांगली जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन संभाजी गायकवाड यांची सांगलीतच माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली. सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब मुरलीधर लोंढे यांची महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषद पुणे येथे सहायक आयुक्तपदी बदली झाली.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील योजना विभागाचे शिक्षणाधिकारी प्रदिपकुमार मनोहर कुडाळकर यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे प्रशासन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.भंडारा जिल्हा परिषदेतील योजना विभागाचे शिक्षणाधिकारी रविंद्र सीताराम सोनटक्के यांच्याकडे भंडारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील जयश्री एकनाथराव चव्हाण यांची बीड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी, सोलापूर जिल्हा परिषदेतील योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा पांडूरंग वटारे यांची बदली मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षणाधिकारी म्हणून झाली.यवतमाळ येथील योजना विभागाचे शिक्षणाधिकारी किशोर भीमराव पागोरे यांच्याकडे यवतमाळ जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाची सूत्रे दिली. पालघर जिल्हा परिषदेतील  योजना विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव एन बडे यांची बदली भंडारा जिल्हा परिषदेच्या योजना शिक्षणाधिकारी म्हणून तर  छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण संचालक रविंद्र बापूसाहेब वाणी यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवपदी बदली झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes