अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑल
schedule03 Jul 26 person by visibility 30 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी, कोल्हापूर : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी शुक्रवारी, तीन जुलै रोजी दुपारी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी एसएमएसवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आपल्या लॉगीनमध्ये आपल्याला केंद्रीय कोटयांतर्गत कोणते कनिष्ठ महाविद्यालय आहे हे तपासावे व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी जावे. ज्या विद्यार्थ्यांस विशेष फेरी अंतर्गत गुणवत्ता यादीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय निश्चित झाले नसेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला इयत्ता १० मध्ये मिळालेले गुण व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे कट-ऑफ याचा विचार करून विशेष फेरी ऑपन टू ऑल 02 फेरीमध्ये आपल्या प्रवेश अर्जाच्या भाग २ मध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरून आपला प्रवेश अर्ज भाग २ लॉक करून प्रिंट काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही कोटयातून (केंद्रीय ऑनलाईन / अल्पसंख्याक / इन-हाऊस / व्यवस्थापन कोटा) एकदा प्रवेश निश्चित केल्यास तो पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो. अशी माहिती प्रसिद्धीस शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली.