पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!
schedule03 Jul 26 person by visibility 38 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शुक्रवारीु दिवसभरही पावसाची रिपरिप सुरू होती. गेले दोन दिवस संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधारा, रुई, इचलकरंजी, शिंगणापूर, शिरोळ येथील बंधारे मिळून सात बंधारे पाण्याखली आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी सोळा फूट नऊ इंचावर पोहोचली आहे. दरम्यान कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरुन पाणी वाहत आहे. दिवसभर या पाण्यातून वाहतूक सुरू होती. दरम्यान सुरक्षिततेसाठी महापालिकेने राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे. शुक्रवारी सायंकाळी बॅरेकेटस लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.