Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑलसमग्र शिक्षा संघर्ष समितीच्या मुंबई येथील आंदोलनास यशडीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीवार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

schedule03 Jul 26 person by visibility 38 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र  चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री  ॲण्ड  ॲग्रिकल्चरच्या वर्ष २०२६-२०२८ या वर्षासाठीचे  नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र मानगावे, व्यवस्थापन मंडळ व कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण सोहळा शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, कामगारा्रमंत्री आकाश फुंडकर आणि गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची या कार्क्रमासाठी उपस्थिती असणार आहेत.या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र मानगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी,
  उपाध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, उपाध्यक्ष किरण भोसले, उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने, महेंद्र (कैलास ) अग्रवाल,  उपाध्यक्ष  संतोष राणे, उपाध्यक्ष सुनिल किर्दक, उपाध्यक्ष सर्जेराव नलावडे, उपाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष सिद्धार्थ रूहाटीया, व्यवस्थापन समितीत निमंत्रित सदस्य वेदांशू पाटील यांच्यासह नवीन कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होईल. 'गाव तिथे उद्योजक' या संकल्पनेला बळ देणारा हा सोहळा चेंबरच्या १०० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes