डीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
schedule03 Jul 26 person by visibility 32 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , कसबा बावडा येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील ५५ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्याना वार्षिक ६.५० लाख रुपयापर्यंत पॅकेज मिळाले आहे.
एकूण १८ आघाडीच्या कंपन्यांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना प्लेसमेंट मिळाली आहे. यामध्ये मुंबईस्थित टेक्निमोंट आयसीबी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये किरण ढेरे याची वार्षिक ६.५० लाख रुपये पॅकेजवर निवड झाली आहे. तसेच सोलर ग्रुप लिमिटेड, नागपूर येथे सहा विद्यार्थ्यांची ५.५० लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, संस्थेकडून दिले जाणारे उद्योगाभिमुख शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स आणि मुलाखतपूर्व तयारीचे विशेष मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असून त्याचा सकारात्मक परिणाम प्लेसमेंटमध्ये दिसून आला. या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, केमिकल विभागप्रमुख डॉ.के.टी.जाधव, प्लेसमेंट समन्वयक, ट्रेनिंग समन्वयक तसेच सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सी. एचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ.के.टी.जाधव, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.