Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डददजज डडडीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

जाहिरात

 

डीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

schedule05 Oct 26 person by visibility 70 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शैक्षणिक संशोधन निर्देशांकातर्फे  जाहीर करण्यात आलेल्या २०२६ च्या जागतिक 'टॉप १००० संशोधक' क्रमवारीत डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील तीन प्राध्यापकांनी स्थान मिळवले आहे.  या यादीत प्रा. (डॉ.) विनायक पारळे यानी ४९ वे स्थान मिळवले असून डॉ. शिवानंद एस. शिरकोले यानी १९५ वे तर डॉ. उमेश व्ही. शेंबडे यांनी ५०९ वे स्थान प्राप्त केले आहे. 

प्रा.  पारळे यांचे जपानमध्ये प्रथम स्थान विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) विनायक जी. पारळे यांनी “एरोजेल्स आणि उष्णतारोधन तंत्रज्ञान” या अत्यंत महत्त्वाच्या संशोधन विषयात २०२१-२०२५ या प्रभाव कालावधीसाठी जागतिक क्रमवारीत ४९ वे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, जागतिक टॉप १००० मध्ये या विषयात त्यांनी जपानमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९५.१० असून ते जगातील सर्वोच्च १.१ टक्के वैज्ञानिकांमध्ये समाविष्ट आहेत. या विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी त्यांनी जपानच्या हिरोशिमा विद्यापीठात आणि दक्षिण कोरियाच्या यॉन्सेई विद्यापीठात महत्त्वपूर्ण संशोधन कार्य केले असून, त्यांचा यापूर्वी स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून जाहीर होणाऱ्या जगातील सर्वोच्च २ टक्के वैज्ञानिकांच्या यादीतही समावेश झाला होता.

विद्यापीठाचे अधिष्ठाता  शिरकोले यांनी “अन्न गोठवण व स्फटिकीकरण प्रक्रिया” या संशोधन विषयात २०२१-२०२५ या कालावधीसाठी जागतिक स्तरावर १९५ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ७७.९० असून ते जगातील ११.१ टक्के सर्वोच्च वैज्ञानिकांमध्ये आहेत.

प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग सहाय्यक प्रा. शेंबडे यांनी “संक्रमण धातूंचे ऑक्साइड नॅनोपदार्थ” या विषयात जागतिक स्तरावर ५०९ वे स्थान, तर भारतामध्ये ७८ वे स्थान प्राप्त केले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८८.८२ असून ते जगातील ४.३ टक्के सर्वोच्च वैज्ञानिकांमध्ये गणले जातात. विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र ए. खोत  यांनी या तिन्ही संशोधकांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes