Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डददजज डडडीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

जाहिरात

 

ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !

schedule05 Oct 26 person by visibility 42 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ट्युमरचे तात्काळ निदान करून रुग्णांना काही क्षणात रिपोर्ट देणाऱ्या अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण सोहळा सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे  निमान्सच्या न्यूरोपॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख आणि जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिता महादेवन यांच्या हस्ते झाला. यावेळी परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामी,   पॅथॉलॉजी प्रमुख डॉ.प्रतिमा मरजक्के प्रमुख  उपस्थित होते.  डॉ. अनिता महादेवन या बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसमध्ये न्यूरोपॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख आणि प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

शस्त्रक्रियेदरम्यान काढलेला ट्युमर  कर्करोगाचा आहे की नाही किंवा कर्करोगाचा संपूर्ण भाग काढला गेला आहे की नाही, या महत्त्वाच्या प्रश्नाला अनेकदा सामोरे जावे लागते. असा काढलेला ट्युमर सर्वसाधारण पॅथॉलॉजी प्रक्रियेला अहवाल (रिपोर्ट) तयार करण्यासाठी ३ ते ४ दिवस लागू शकतात, तर क्रायोस्टॅट मशीन वापरून फ्रोजन सेक्शन तंत्रज्ञानाद्वारे अंदाजे १०-१५ मिनिटांत आवश्यक माहिती मिळते. त्यामुळे शस्त्रक्रिया करत असतानाच डॉक्टर रुग्णावर आवश्यक ते पुढील उपचार तात्काळ करू शकतात व रुग्णाला दिलासा मिळू शकतो. यामुळे ट्यूमरचे स्वरूप आणि सर्जिकल मार्जिनबद्दल त्वरित निर्णय घेण्यास मदत होते. म्हणूनच  क्रायोस्टॅटला खऱ्या अर्थाने "सर्जिकल पॅथॉलॉजीसाठीचे आपत्कालीन साधन" म्हटले जाऊ शकते.

 डॉ. शिवशंकर मरजक्के ह्यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल येथील न्युरो विभागाला जागतिक स्तरावर नेले आहे, ह्या मशीनमुळे अशा स्वरूपाच्या  मेंदूच्या शस्त्रक्रियेला अधिक स्पष्टता येणार आहे. ह्या अत्याधुनिक मशीन ट्रस्ट श्रेणीत कोल्हापुरात पहिल्यांदा सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित होत आहे. सिद्धगिरी हॉस्पिटल येथे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर केवळ ५ ते ६ हजारात होणार असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  पॅथॉलॉजी प्रमुख डॉ.प्रतिमा मरजक्के यांनी यावेळी केले. या लोकार्पण सोहळ्याला सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकश भरमगौडर, डॉ. अंकुश पार्टे, डॉ. तनिष पाटील, डॉ. प्रशांत नाडेकर, डॉ. शंतनू पालकर, डॉ. सचिन पाटील, डॉ. विशाल खलाटे यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes