Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डददजज डडडीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

जाहिरात

 

कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!

schedule05 Oct 26 person by visibility 105 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी कौस्तुभ मुरलीधर गावडे व डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी सोमवारी, पाच ऑक्टोबर २०२६ पुणे येथे अर्ज भरला. महायुतीतंर्गत भारतीय जनता पक्षातर्फे  गावडे व जाधव यांना अनुक्रमे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री जयकुमार गोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री राजेश पांडे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, शरद लाड आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार महेश लांडगे, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिळीमकर, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. राजेंद्र शेजवळ, संस्थेचे आजीव सेवक आर. के. भोसले, विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे,  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव एस. एम. गवळी, पुणे विभागाचे विभागप्रमुख अनिल साकोरे¸ यशवंत माने आदींची उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिक्षक मतदारसंघातील उमेदवार गावडे यांनी, ‘ ही केवळ उमेदवारी नाही, तर पुणे विभागातील शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि प्रभावी प्रतिनिधित्वासाठी सुरू झालेल्या निर्णायक लढ्याची नवी सुरुवात आहे.’अशा भावना व्यक्त केल्या.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes