Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डददजज डडडीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

जाहिरात

 

भाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !

schedule05 Oct 26 person by visibility 148 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. हे दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत. पदवीधरमधून डॉ. स्मिता जाधव तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीच्या नेत्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ एकत्रितपणे लढविण्याची घोषणा केली. मात्र या दोन्ही मतदारसंघात महायुतीतीलमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’हे स्पष्टपणे दिसत आहे. शिवसेना व  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे भाजपा नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

शिवसेनेकडून वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेतर्फे, चिवटे यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला. भाजपाने रविवारी, चार ऑक्टोबर रोजी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली.भाजपने उमेदवारी घोषित करुन चोवीस तास होण्याअगोदरच शिवसेनेने इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. चिवटे हे मंगळवारी, सहा ऑक्टोबर रोजी पुणे येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. - नेहरू मेमोरियल हॉल ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ते अर्ज भरतील. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे सचिव संजयजी मोरे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, आमदार श्रीमती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते  युवा सेना सचिव बाजीराव चव्हाण यांनी चिवटे यांच्यासाठीचा एबी फॉर्म स्विकारला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी,दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्ली दौऱ्यातही त्यांनी, पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे हे निवडणूक लढवतील असे म्हटले आहे. बंडखोरी टिकणार की भाजप नेते समजूत काढणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

पुणे विभागीय मतदारसंघातून निवडणूक लढवायची म्हणून तयारी करणारे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भैया माने यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. माने हे मंगळवारी, सहा ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करत पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.कागल येथून मोठया संख्येने त्यांना मानणारे कार्यकर्ते पुण्याला जाणार आहेत. गेले दोन दिवस ते पुण्यात होते. सोमवारी, ते कागलला परतले. मंगळवारी पहाटे ते पुण्याला रवाना होणार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ते, राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असतील असतील अशी चर्चा होती. मात्र उपलब्ध माहितीनुसार माने हे अपक्ष म्हणून नशीब आजमावणार आहेत. ते, मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम केले आहे. ‘माझे भविष्य अंधकारमय करायचे नाही, मी लढणार नाही. नशिब आजमावणार आहे.’असे मुश्रीफांना सांगून बाहेर पडलेले माने आता अपक्ष म्हणून लढाईच्या पावित्र्यात दिसत आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes