Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुणे शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफकडून  कौस्तुभ गावडे यांची  उमेदवारी जाहीरकोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीदकोल्हापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठाशिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन

जाहिरात

 

बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा

schedule29 Aug 26 person by visibility 61 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन  : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीवेळी संचालक मंडळातील राजकीय कोटया चांगल्याच रंगल्या. काहींना पद मिळाल्याचा आनंद तर कुणाच्या मनात पदाने हुलकावणी दिल्याची सल, त्याचवेळी नेतेमंडळीप्रती दाखविली जाणारी निष्ठात्यासाठी कुणाचा नेत्यांच्या नावासाठी आग्रह तर कुणाकडून नामोल्लेख टाळण्याचा प्रकारयामुळे निवडीची सभा चांगलीच गाजली.

बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीद यांची निवड झाली. निवडीनंतर शुभेच्छा आणि सत्काराचा कार्यक्रम झाला. मुळात बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ता. मात्र गटातटासाठी प्रतिष्ठा ठरलेली. प्रा. देसाई हे राष्ट्रवादीचे, माजी आमदार के. पी. पाटील गटाचे. काशीद हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे. संचालक शिवाजी पाटील, बाळासाहेब पाटील यांनी भाषणाला सुरुवात करताना, ‘प्रा. शेखर देसाई हे प्राध्यापक आहेत. आता बाजार समितीत ते आमचे प्राचार्य आणि आम्ही संचालक सगळे त्यांचे विद्यार्थी. नवीन पदाधिकाऱ्यांनी साऱ्यांना सोबत घेऊन कामकाज करावे.’अशी सुरुवात केली. संचालक प्रकाश देसाई यांनी, ‘शालेय पोषण आहारात कोल्हापुरी गुळाचा समावेश व्हावा’अशी आग्रही मागणी केली.

महाापलिकेचे राजकारण बाजार समितीत

संचालक नंदकुमार वळंजू यांनी, ‘बाजार समितीमध्ये एकेका सभापतींनी पाच पाच वर्षे सभापतिपदी काम केले आहे. मात्र गेल्या काही वर्षात बाजार समितीची अवस्था महापालिकेसारखी झाली आहे. वर्षाचा सभापती, आठ महिन्याचा सभापती, मावळते सभापती तर चार महिन्याचे सभापती ठरलेपदांची खांडोळी बंद व्हायला पाहिजे.’अशी अपेक्षा व्यक्त केली. वळंजू यांनी मावळते सभापती नानासो कांबळे यांना सभापतिपदी काम करण्यासाटी चार महिने मिळाले. या कमी कालावधीत त्यांनी चांगले काम केले. मात्र त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेल्यावर ते, मला नेत्यांना सांगावं लागेल. त्यांनी होकार दिला तरच कामअसे ते उत्तर द्यायचं. त्यावर आम्ही म्हणायचे, ठीक आहे, सभापती साहेब, जसं नेते सांगतील तसं गाडी पुढे जाऊ दे.’ त्यांच्या या विधानावर हंशा पिकला.

जो चुकेल त्याला शासन आणि जो प्रामाणिकपणे काम करतो त्यांना पद

 काँग्रेसचे संचालक सुयोग वाडकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पाहत, ‘ पदासाठी माझा नंबर  लागेल असे वाटत होते. म्हणून मी फेटाही बांधला नव्हता. मात्र माझ्या नेत्यांकडून काही संदेश आला नाही. मग ठरविलं, आता थांबू. सभापतिपदासाठी पुढील वर्षी वाट पाहू.’ नूतन उपसभापती पांडूरंग काशीद यांच्या मनोगतातून परखडपणा व स्पष्टवक्तेपणा झळकला. त्यांनी माजी आमदार संजयसिंह गायकवाड, संजीवनीदेवी गायकवाड, पी. एन. पाटील यांच्या स्मृती जागविल्या. ‘पी. एन. पाटील यांच्या कामाची पद्धत खूपच वेगळी होती. ते आमदार असोत की नसोत कामे व्हायची. आमदार नसतानाही ते आमदार असल्यासारखेच काम करायचे.’असे सांगत काशीद म्हणाले, ‘जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. आज मला पद मिळणार आहे, मला माहित नव्हते. न मागता त्यांनी मला पद दिले. खरं तर, बाजार समितीच्या दुसऱ्या वर्षीच्या सभापती निवडीवेळी मला संधी होती. माझे नाव निश्चित होते. पण काही लोकांनी आमदार कोरे यांना माझ्याविषयी चुकीचे सांगितले. यामुळे शेवटच्या पाच मिनिटात माझे नाव बदलले. आणि संचालक अॅड. प्रकाश देसाई यांची सभापतिपदी वर्णी लागली. मात्र माझ्याविषयी चुकीची माहिती देणाऱ्या दोघांची आज अवस्था वाईट झाली आहे. माझ्याविषयी चुकीचे सांगितल्याने आमदार कोरे यांचा गैरसमज झाला होता. मी, तेव्हा तत्काळ त्यांच्याकडे संचालकपदाचा राजीनामा दिला होता. संचालकपदाचा राजीनामा दिला तरी तुमच्यासोबतच राहणार असे सांगितले. आमदार कोरे यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही. जो चुकेल त्याला शासन आणि जो प्रामाणिकपणे काम करतो त्यांना पद हे कोरे यांचे सूत्र आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास कायम ठेवत उपसभापती केले. उपसभापती म्हणून काम करताना कोणाची फसवणूक होणार नाही.’

सभापतींनी खासदारांचा नामोल्लेख टाळला..

सत्काराला उत्तर देताना सभापती शेखर देसाई यांनी जिल्ह्यातील सगळया राजकीय नेत्यांची नावे घेतली. ते, नेत्यांच्या नावाचा उल्लेख करत असताना खासदार धनंजय महाडिक यांचा उल्लेख केला नव्हता. तेव्हा संचालक नंदकुमार वळंजू यांनी, ‘खासदार महाडिक यांचे नावही घ्या’असे सांगितले. त्यावर सभापती देसाई यांनी, ठीक आहे ठीक आहे म्हणून नामोल्लेख टाळलाच. त्याच दरम्यान काँग्रेसचे संचालक वाडकर यांनी, ‘पुढे चला..भाषण पुढे जाऊ दे’असे म्हणत वळंजू यांना डिवचण्याचा प्रयत्नही केला. कार्यक्रम संपल्यानंतर संचालक वळंजू यांनी सत्ताधारी संचालकांना उद्देशून, ‘तुम्ही भाषणात खासदार महाडिकांचे नाव घेतले नाही. आता भाजपची ताकत दाखवू.’असे म्हणाले. भाषणात सभापती देसाई यांनी भाषणात माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कामगिरीचा उल्लेख केला. बाजार समितीत ते प्रशासक असताना समितीच्या ठेवी वाढविल्या. कामकाजाला शिस्त लावली. असे सांगितले. देसाई म्हणाले, ‘आता बाजार समिती सभापती म्हणून मी मोठी आश्वासने देणार नाही. बाजार समितीच्या हितासाठी जे आम्ही काम करू ते तुम्हाला दिसेल.’असे देसाई यांनी नमूद केले. तसेच बाजार समितीतील संचालक हे माझे विद्यार्थी नव्हेत तर मी त्यांना प्राचार्यही मानतो. सभापती म्हणून काम करताना, नेते मंडळीचे नावल खराब होईल असे कोणतेही कृत्य करणार नाही.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes