Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबादप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखीसतेज पाटलांच्याकडे ठरावधारकांची संख्या कमी, म्हणून ते भाजप नेत्यांना भेटतात - धनंजय महाडिकबाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

सतेज पाटलांच्याकडे ठरावधारकांची संख्या कमी, म्हणून ते भाजप नेत्यांना भेटतात - धनंजय महाडिक

schedule29 Aug 26 person by visibility 257 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक  महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होईल . विधानसभेप्रमाणे गोकुळच्या निवडणुकीतही महायुतीला घवघवीत यश मिळेल. ज्या पद्धतीने विधानसभेला दहा विरुद्ध शून्य अशा फरकाने निवडणूक आम्ही जिंकली. त्याच पद्धतीने गोकुळच्या निवडणुकीतही महायुतीचे 25 संचालक निवडून येतील . 25 विरुद्ध 0 अशी  निवडणूक  जिंकू. गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच आम्ही लढवणार आहोत. महायुतीचं गोकुळची निवडणूक दहीहंडी फोडणार असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तसेच त्यांनी महाविकास आघाडीचे नेते व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे ठरावधारकांची संख्या कमी असल्यामुळे ते भाजप नेत्यांना भेटत आहेत असा टोलाही लगावला. गोकुळ मध्ये भाजपच मोठा भाऊ राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानल्या जाणाऱ्या दहीहंडीचे आयोजन केले आहे . या दहीहंडी मध्ये प्रथम क्रमांक विजेत्या संघाला तीन लाख रुपयांचे बक्षीस तर पाच थरापासून ते आठ थरांची सलामी देणाऱ्या संघांना आकर्षक बक्षीस दिली जातात . या या दहीहंडी संबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार महाडिक बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ,यांच्या नेतृत्वाखाली महायुती  म्हणून आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढत आहोत. भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्ष अशी मिळून आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. महायुतीचे संख्याबळ मोठे आहे. ताकद मोठी आहे. त्यामुळे कोणालाही बिनविरोध निवडणुकी संदर्भात प्रस्ताव द्यायचा विषयच उपस्थित होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. गोकुळची निवडणूक कशी होईल काय होईल त्याबद्दल मी आता काही सांगणार नाही तसेच बिनविरोध निवडणूक होईल का यावरही त्यांनी जादा भाष्य करणे टाळले. 
 गेल्या काही दिवसापासून ठरावधारकांच्या पात्रतेवरून मंत्री मुश्रीफ विरुद्ध महाडिक गट असा संघर्ष रंगविला जात आहे याकडे लक्ष वेधला असता खासदार महाडिक म्हणाले मंत्री मुश्रीफ व  आमच्यामध्ये गैरसमज निर्माण व्हावा असे काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र सध्या ज्या ठरावधारकांचा विषय न्यायप्रविष्ठ आहे त्यामध्ये आमच्या गटाचे ठरावधारकही आहेत . प्रत्येक जण त्या ठरावधारकांना न्याय मिळावा यासाठी लढत आहेत. आम्ही त्यासाठी लढत आहोत. पात्र सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला असावा यासाठी आम्ही हीच आमची भूमिका आहे
 काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर व भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेतली आहे याकडे लक्ष वेधले असता खासदार महाडिक म्हणाले, '  निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त ठराव धारकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी अनेकांना भेटत असतात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात महायुती भक्कम आहे माहितीकडे ठरावधारकांची संख्या आहे मोठी आहे. या उलट महाविकास आघाडीकडे ठरावधारक संख्या कमी आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते हे भाजपच्या नेत्यांना भेटत आहेत असा टोलाही खासदार महाडिक यांनी लगावला. पाच वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीच्या संदर्भात ते म्हणाले गेल्यावेळी राज्यांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आधार घेत काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील महाविकास आघाडीचे पॅनल तयार केले दबाव टाऊन सगळ्यांना एकत्र केले मग आता ते समविचारी  आघाडीची भाषा कशी बोलत आहेत असा सवाल ही त्यांनी केला तसेच खासदार महाडिक म्हणाले शक्तिपीठ महामार्ग होणारच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्तीपीठ महामार्गाला जे विरोध करत आहेत त्या शेतकऱ्यांची समजूत काढू अनेक ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला समर्थ ही मिळत आहे जे विरोध करत आहेत त्यांच्याशी चर्चा केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला धनंजय महाडिक युवाशक्तीचे प्रमुख पृथ्वीराज महाडिक, उत्तम पाटील,  विनोद कांबोज, प्रमोद पाटील, विजय टिपुगडे,  सागर बगाडे, राजेंद्र बनसोडे, विनायक सुतार, नगरसेवक वैभव कुंभार, करण जाधव आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes