Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

जाहिरात

 

महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

schedule15 Oct 26 person by visibility 263 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : 'पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे हे अभ्यासू आणि प्रभावी आहेत. त्यांना शिक्षण क्षेत्राविषयी प्रेम आहे. अनेक वर्षे ते शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत या निवडणुकीत त्यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन पहिल्या फेरीतच निवडून आणू या.' असा निर्धार महायुतीच्या नेते मंडळाच्या उपस्थित झालेल्या प्रचार मेळाव्यात करण्यात आला
भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापुरातील कार्यालयात गुरुवारी सायंकाळी डॉ. जाधव व गावडे यांच्या प्रचारार्थ निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मंत्री हसन मुश्रीफ हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार   राजेश क्षीरसागर , आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, महापौर रूपाराणी निकम, माजी आमदार संजय घाटगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम,  भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, राष्ट्रवादीचे आदिल फरास, माणिक पाटील चुयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. यावेळी महायुतीच्या नेते मंडळींनी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या कामगिरीचे कौतुक केले  शिक्षक व पदवीधरांच्या विविध विषयांना महायुती सरकारने न्याय दिला आहे. वाढीव टप्पा अनुदान  शिक्षक भरती प्राध्यापक भरती असे विविध विषय सरकारने मार्गी लावले आहेत. पदवीधर व शिक्षक मतदार संघात महायुतीने तरुण चेहरे दिले आहेत पाची जिल्ह्यात प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीचे मत घेऊन पहिल्या फेरीतच विजय होतील.' असा विश्वास मंत्री मुश्रीफ , मंत्री आबिटकर  खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
 शिक्षक मतदार संघातील उमेदवार कौस्तुभ गावडे म्हणाले, 'शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने आपण पाठपुरावा करत आहोत वाढीव टप्पा अनुदान,  संच मान्यतेचा विषय, जुनी पेन्शन योजना अशा विविध विषयांमध्ये शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम केले आहे. शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवताना शाळा आणि शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला आपले प्राधान्य राहील. गेली सहा वर्ष विद्यमान आमदारांची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.' असाही टोला त्यांनी मारला. विराज चिखलीकर यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes