Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

जाहिरात

 

ना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!

schedule16 Oct 26 person by visibility 192 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन -: गोकुळ….कोल्हापूर जिल्ह्यातील मोठी आर्थिक ताकत. साडेपाच लाख दूध उत्पादकांशी थेट संबंधित संस्था…दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीतून हजारो कोटीची उलाढाल…आणि थेट शेतकऱ्यांशी निगडीत अर्थकारण व राजकारण असल्यामुळे गोकुळवरील सत्ताही  ही साऱ्याच राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचा विषय. गोकुळमध्ये संचालक हवे यासाठी कुणीच मागे नसते. यंदाच्या राजकीय धामधुमीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची निवडणूक लढत आहेत।. समविचारी आघाडीचे नेतृत्व करत आहेत. त्या आघाडीच्या उमेदवारात आमदार पाटील यांचे ना कुणी नातेवाईक…ना कुणी कुंटबांतील सदस्यांची संचालकपदासाठी दावेदारी…

‘आमचा लढा गोकुळ टिकवण्यासाठी….कोल्हापूर जिल्हयाचा स्वाभिमान जपण्यासाठी’अशी हाक देत त्यांनी सारा जिल्हा पिंजून काढला. प्रत्येक तालुक्याचा दौरा केला. तालुकानिहाय मेळावे घेतले. सोळा कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘पशुखाद्याचा तर पहिल्याच महिन्यात शंभर रुपयांनी कमी करणार. जातीवंत म्हैस खरेदीसाठी जनावरांच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान देणार. म्हशीच्या दूध खरेदी दरात किमान पाच रुपये आणि गायीच्या दूध खरेदी दरात किमान दोन रुपयांची वाढ देणार. प्रत्येक तालुक्यात २४ पास पशुवैद्यकीय सेवा देणर. डॉक्टरांची संख्य वाढवून डॉक्टर ऑन कॉल…गोकुळ युवा उद्योजकाच्या माध्यमातून किमान पाच हजार तरुणांना  स्वतचा व्यवसाय उभा करण्यास प्रोत्साहन देणार, वासरु संगोपन योजनेच्या अनुदानात वाढ...पाच वर्षात गोकुळ भगिनी उद्योग उभारुन त्या माध्यमातून २५ हजार भगिनींना घराजवळच वर्षभर जोड व्यवसायातून उत्पन्न मिळवून देणार.’या योजनांचा समावेश आहे.

आमदार पाटील यांच्याकडे समविचारी आघाडीचे एकहाती नेतृत्व आहे. समविचारी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्षाला प्रत्येक एक जागा दिली आहे. समविचारी आघाडीची बांधणी करताना अनुभवी व तरुण चेहऱ्यांचा मिलाफ साधला आहे. उमेदवारांना सोबत घेऊन ते दूध उत्पादकापर्यंत भूमिका पोहोचवत आहेत. गोकुळचे अस्तित्व टिकले पाहिजे, गोकुळ कोल्हापुरातच राहिले पाहिजे यासाठी आपली लढाई आहे. यासाठी समविचारी आघाडीला निवडून द्या’अशी साद दूध उत्पादक शेतकऱ्यांना घालत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes