जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यश
schedule16 Oct 26 person by visibility 42 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा २०२६–२७ मध्ये कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), कोल्हापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता रणदिवे हिने वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा या विद्याशाखेतून द्वितीय क्रमांक केला या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध विद्याशाखा अंतर्गत एकूण १२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ .प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा मैंदर्गी, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. नाईक, आविष्कार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. एस. देसाई, अविष्कार समन्वयक डॉ. पी. एन. देवळी यांचे मार्गदर्शन लाभले.