शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडे
schedule16 Oct 26 person by visibility 38 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ४६ व्या युवा महोत्सव २०२६–२७ मध्ये विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या विद्यार्थी कलाकारांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. मुधोजी महाविद्यालय फलटण येथे झालेल्या 46 व्या शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवांमध्ये विवेकानंद महाविद्यालयास वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळविली. शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात सलग १८ वर्षे अव्वल येण्याचा बहुमान पटकावला.
या युवा महोत्सवात – लोककला – प्रथम क्रमांक , एकपात्री अभिनय – प्रथम क्रमांक, प्रहसन – प्रथम क्रमांक , शास्त्रीय सुगम गायन – प्रथम क्रमांक , शास्त्रीय तबलावादन – प्रथम क्रमांक , पाश्चिमात्य एकल गायन – प्रथम क्रमांक, एकांकिका - प्रथम क्रमांक, भारतीय समुहगीत – प्रथम , शास्त्रीय सुरवाद्य – प्रथम , शास्त्रीय तालवाद्य – प्रथम, पाश्चिमात्य एकल गायन – प्रथम, पाश्चिमात्य एकल वादन - द्वितीय. याशिवाय इतर विविध स्पर्धांमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते सांस्कृतिक विभागातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना त्यांनी गेली अठरा वर्षे विवेकानंद महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये जनरल चॅम्पियनशीप पटकावत आहे. ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. ’अशा शब्दांत कौतुकोद्गार काढले. कार्याध्यक्ष साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राचार्य मिलिंद हुजरे यांनी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आरिफ महात , सदस्य् डॉ राजश्री पाटील, प्रा संदीप पाटील, डॉ.संपदा टिपकुर्ले, प्रा सतीश उपळावीकर, प्रा. एच.व्ही.चामे, संगीत शिक्षक महेश हिरेमठ, सुधर्म देसाई यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉ. सी. बी. पाटील, डॉ. एकनाथ आळवेकर, श्री हितेंद्र साळुंखे, रजिस्ट्रार एस के धनवडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.