Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

जाहिरात

 

पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलू

schedule16 Oct 26 person by visibility 51 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर -: ‘शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, महापालिका नगरसेवक, स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, पक्ष संघटक अशा विविध पातळीवर मी काम केले आहे.कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. आज पदवीधरांच्यासमोर विविध प्रश्न आहेत. पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे.नोकरी, रोजगार, स्थलांतरण, पेपरफुटी, भरती असे विविध विषय भेडसावत आहेत. या साऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीला आपले प्राधान्य राहील. हे सारे प्रश्न सोडवू’अशी भूमिका  पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार व नगरसेवक सुनील मोदी यांनी मांडली.

 सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. जिल्हानिहाय मेळावे सुरू आहेत. शिवसेना ठाकरे पक्ष पहिल्यांदाच पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून नगरसेवक मोदी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू, उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, महिला संघटक व नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, शहरप्रमुख मंजीत माने, विशाल देवकुळे आदींच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात प्रचार मेळावा झाला.

उमेदवार मोदी म्हणाले, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी घोषित केली, पदवीधरमधून मी आज शिवसेनेचा उमेदवार म्हणून आमदारकीसाठी लढत आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांनी माझी उमेदवारी घोषित करुन, दोन तास बैठक घेऊन प्रचाराचे नियोजन केले हे मी माझे भाग्य समजतो. प्रत्येक कार्यकर्त्याने पंचवीस पदवीधर मतदारांशी संवाद साधत मतदानास प्रवृत्त केले तर शिवसेनेचा आमदार निवडून येण्यामध्ये काही अडचण नाही. शिवसेना निवडणुकीच्या मैदानातून कधीही माघार घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने, शिवसेनेला गृहित धरू नये. अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर  ढकलू.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes