Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डददजज डडडीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

जाहिरात

 

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, आता उमेदवारांची निश्चिती ! सारेच इच्छुक प्रचारात, उमेदवार निवडताना नेत्यांची कसोटी !!

schedule05 Oct 26 person by visibility 284 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोणाला किती जागा यावरुन बरेच दिवस महायुतीमधील काथ्याकूटला अखेर पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षात जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. दरम्यान सगळयाच पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रचारार्थ जिल्हा पिंजून काढत आहेत. प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या जादा आणि जागा मर्यादित असल्यामुळे उमेदवारी निश्चित करताना नेतेमंडळीची कसोटी लागणार आहे. सोमवारी, उमेदवारी निश्चित केली जाईल. उमेदवारांची अधिकृत घोषणा व्हायची आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व यड्रावकर गट मिळून नऊ जागा, भारतीय जनता पक्षाला सात  जागा, शिवसेनेला सात जागा आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागा असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. गोकुळच्या २५ संचालकपदाच्या या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील जागा वीस आहेत. महिला गटातील दोन जागा आहेत. भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती व ओबीसी गटात प्रत्येकी एक जागा आहे. गोकुळ निवडणुकीवर डोळा ठेवून इच्छकु उमेदवार जिल्हा पिंजून काढत आहेत. रोज एका तालुक्याचाा दौरा सुरू आह.

महायुतीमध्ये जागा वाटपावरुन शेवटपर्यंत रस्सीखेच होती. अखेरीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवटपर्यंत जादा जागांचा आग्रह राहिला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर राष्ट्रवादीत मोठा भाऊ राहील असे सांगताना ठरावधारकांच्या संख्येवरुन जागा वाटप व्हावे अशी मागणी लावून धरली होती. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेने जादा जागा वाढवून मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. एकीकडे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरायचा असताना इच्छुक उमेदवारानी मात्र प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. प्रत्येक पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसककडून गोकुळचे माजी आमदार राजेश पाटील¸ माजी चेअरमन अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ, माजी संचालक युवराज पाटील, रणजितसिंह पाटील, बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, तेजस्विनी पाटील, प्रा. किसन चौगले यामधून नावे निश्चित होणार आहेत. तर भाजपकडून माजी संचालिका शौमिका महाडिक, चेतन नरके, अंबरिश घाटगे, दीपक पाटील, अशोक चराटी, नाथाजी पाटील, प्रताप पाटील, विश्वास जाधव, रामचंद्र भोगम यामधून सात नावे निश्चित होतील.शिवसेनेकडून गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, अजित नरके, अशोक फराकटे, अॅड विरेंद्र मंडलिक, मदन देसाई, अजित पाटील, माजी आमदर सुजित मिणचेकर, माजी संचालक एस. आर. पाटील यांच्यातून सात नावे निश्चित होतील. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून माजी संचालक अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड ही नावे निश्चित आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes