जैन समाजाच्या हितासाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण, माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule02 Aug 26 person by visibility 18 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ दक्षिण भारत जैन सभा ही जैन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरतआहे.समाजाच्या विविध अडीअडचणीच्या काळात मदत करणारी जैन सभा असून समाज हित व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण आहे.’असे गौरवोद्गगार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. कोल्हापूरवासियांच्या भावनेशी जुळलेल्या माधुरी हत्तीला नांदणी येथील मठात परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले.
दक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित केले होते. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ,कोल्हापूर व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ,नांदणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला. या अधिवेशनात खासदार छत्रपती शाहू महाराज, दोन्ही जैन धर्मगुरु,आमदार सतेज पाटील,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार संजय पाटील, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जैन समाज हा धार्मिक आणि अहिंसा जपणारा समाज आहे.दक्षिण भारत जैन सभेमार्फत गरजु विद्यार्थांसाठी तसेच शेतकरी वर्गासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.उत्तम संघटन म्हणून कशा पध्दतीने काम करावे याचे जैन समाज हे एक उत्तम उदाहरण आहे.कागल येथील जैन समाजाला बक्षीस म्हणून दिलेली जागा विकसित करु त्याचबरोबर कागल तालुक्यातील बामणी येथील भगवान महावीराचे एक पुरातन मंदिर असून भगवान महावीर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम निश्चितपणाने मार्गी लावू. आमदार राहुल आवडे यांनी हातकणंगले तालुक्यातील श्रीक्षेत्र कुंथुगिरी व श्रीक्षेत्र बाहुबली या मंदिरासाठी जिल्हा नियोजनमधून अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली असता त्याला त्यांनी सकारात्मकता दर्शविली. याप्रसंगी दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र प्रगतीचे व जिनविजय या डिजिटल अंक व पंचसुत्री स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार वीरकुमार पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअरमन संजय शेटे,अभिनंदन पाटील, अनिल बागणे, बाळासाहेब पाटील, शशिकांत राजोबा, डॉ. अजित पाटील, राजेंद्र झेले, दादा पाटील चिंचवाडकर, स्वागताध्यक्ष अनिल पाटील अध्यक्ष अॅड. पी. आर. पाटील, अजित बी. पाटील, सुनील पाटील, अनिल मादनाईक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे आदी उपस्थित होते.