Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू महाराज : एक संक्षिप्त चरित्रच्या इंग्रजी आवृत्तीचे जपानी शिक्षणतज्ज्ञांकडून कौतुककोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय - मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहातबाळूमामा देवस्थानमधील गैरव्यवहारातील आरोपींना अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – डॉ. युवराज येडूरेजैन समाजाच्या हितासाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण, माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्ह्यातील सगळे दिग्ग्ज सत्तेत…राजकारणात माझ्यासारखा विरोधक एखादाच… मलाही सांभाळून घ्या ! सतेज पाटलांना मुश्रीफांच्या शुभेच्छा…प्रकाशअण्णा राजकारणात धुरंधर ! ! शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज :  शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतड्रायव्हर सीटवर खासदार, बसमध्ये नगरसेवक ! पीएमईच्या नव्या वाहनातून फेरफटका !!ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा राज्यव्यापी व्यापारी परिषदेला राज्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणारमहाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ - संजय कृष्णाजी पाटील

जाहिरात

 

राजर्षी शाहू महाराज : एक संक्षिप्त चरित्रच्या इंग्रजी आवृत्तीचे जपानी शिक्षणतज्ज्ञांकडून कौतुक

schedule02 Aug 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाची चर्चा केली नाही, तर धाडसी निर्णय आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यांचे जीवन, तत्त्वज्ञान आणि दूरदृष्टी आजच्या काळातही तितकीच प्रेरणादायी मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार जपानमधील शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, प्रेरणादायी वक्ते तथाहो-मे-आय-कूग्रुपचे संस्थापक कुनिओ हारा यांनी काढले.

कुनिओ हारा नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी ज्येष्ठ लेखक आणि राजर्षी शाहू अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखितराजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्रया पुस्तकाची प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी अनुवादित केलेली इंग्रजी आवृत्ती ‘Rajarshi Shahu Maharaj: A Concise Biography’ डॉ. पवार यांनी त्यांना भेट दिली. पुस्तकाचे सखोल वाचन केल्यानंतर हारा यांनी प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांना विशेष पत्र पाठवून पुस्तकातील विचार आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी आदर व्यक्त केला.

हारा यांनी पत्रात म्हटले आहे की,  ‘पुस्तक मी अत्यंत बारकाईने वाचले. त्यातील प्रत्येक प्रकरणाने मला अंतर्मुख केले आणि खोलवर प्रेरित केले. हे केवळ एका महान राजाचे चरित्र नसून, राजर्षी शाहू महाराजांचे जीवन, तत्त्वज्ञान आणि असाधारण दूरदृष्टी भावी पिढ्यांसाठी जतन करणारी एक अभ्यासपूर्ण कलाकृती आहे. त्यांनी केवळ परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त केली नाही, तर धाडसी कृतीतून सामाजिक परिवर्तन प्रत्यक्षात घडवून आणले.”

  ‘हो-मे-आय-कूआणिकामी मेमोया शैक्षणिक संकल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या हारा यांना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांमध्ये आपल्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाशी अनेक समान मूल्ये आढळली. वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला दिलेल्या भेटीचाही हारा यांनी पत्रात आवर्जून उल्लेख केला आहे

               

 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes