Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाशडॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरवथकित बिलासाठी शासकीय कंत्राटदारांचा सरकारच्या विरोधात आक्रोश ! बिलातील 54 टक्के रक्कम वाटपात, आमदारांना दहा टक्के - अधिकाऱ्यांना 15 टक्के !!लिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू - सत्यजीत कदम यादवनगर भागात विकास कामांचा प्रारंभ, माजी नगरसेवकांची उपस्थितीपदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटीलमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची कंपनी प्रशासनाकडून अहवेलना, वीज कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यातशिक्षण समितीकडून शाबासकीची थाप, कुरुंदवाडच्या पीएमश्री कुमार विद्यामंदिरला दोन कोटी पाच लाखाचा निधीआमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटीलमाझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालट

जाहिरात

 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची कंपनी प्रशासनाकडून अहवेलना, वीज कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात

schedule13 Jun 26 person by visibility 149 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समाजातील विविध घटकांच्या बैठका घेतात. न्याय देण्याचे आदेश देतात. मात्र त्यांच्या आदेशाची तंतोतंत अथवा प्रभावी अंमलबजावणी संबंधित प्रशासकीय अधिकारी करत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अहवेलना सुरू आहे असे मत भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी मांडले.

फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री असल्याने राज्यातील वंचित वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यां मांडण्याचे काम भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून करत असताना हे अनुभव आल्याचे संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे म्हणाले. ९ सप्टेंबर  २०२४ रोजी फडणवीस यांनी संघटने सोबत बैठक घेतली. कामगारांच्या मागण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतले. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी घेतलेल्य निर्णयांची अंमलबजावणी वीज कंपनी प्रशासनाकडून न  झाल्याने वीज कामगारांच्या समस्यां वाढल्या. कंत्राटदारांकडून कामगारांना दोन ते चार महिने वेतन मिळत नाही, रोजगारात सुरक्षितता नाही, कंत्राटदारांकडून आर्थिक पिळवणूक थांबत नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात अचानक कामबंद आंदोलनाची भूमिका घेण्याची तयारी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने चालू केली असल्याचे निलेश खरात यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes