Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटेटाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ, २६६ खेळाडूंचा सहभागटीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज, शहरातील ५४ केंद्रावर ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा  वाजली !  प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !! चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे

जाहिरात

 

माझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालट

schedule13 Jun 26 person by visibility 175 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भूमिपुत्र शेतकरी गट, पाणी फाउंडेशन तसेच शाळा व्यवस्थापन समिती  सदस्य, विद्या मंदिर वाळवे खुर्द  यांच्या सहयोगातून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर  सामाजिक बांधिलकी, श्रमसंस्कार आणि शाळेप्रती असलेल्या जिव्हाळ्याबद्दल विद्या मंदिर वाळवे खुर्द शाळा परिसराची स्वच्छता करून उपकृत केले.
शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ती गावाच्या संस्कृतीचे, संस्कारांचे आणि उज्ज्वल भविष्याचे केंद्रस्थान असते, या भावनेने  शाळेच्या उन्नतीसाठी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. शाळा परिसर स्वच्छता, पूर्वतयारी आणि परसबाग निर्मितीसाठी श्रमदान केले. हातात झाडू, खोरे, पाटी आणि स्वच्छतेची साधने घेऊन सर्वांनी प्रत्यक्ष श्रमदान करत "माझी शाळा, माझा अभिमान" ही भावना कृतीतून साकारली. विशेषतः भूमिपुत्र शेतकरी गट, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांचे परिश्रम आदर्शवत आहेत.
समितीचे स सदस्य  अशोक शेणवी, राजेंद्र शिपेकर यांनी स्वतः पुढाकार घेत परसबाग निर्मिती, परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळेचा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर, हिरवागार बनला. विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी व आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes