Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाशडॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरवथकित बिलासाठी शासकीय कंत्राटदारांचा सरकारच्या विरोधात आक्रोश ! बिलातील 54 टक्के रक्कम वाटपात, आमदारांना दहा टक्के - अधिकाऱ्यांना 15 टक्के !!लिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू - सत्यजीत कदम यादवनगर भागात विकास कामांचा प्रारंभ, माजी नगरसेवकांची उपस्थितीपदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटीलमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची कंपनी प्रशासनाकडून अहवेलना, वीज कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यातशिक्षण समितीकडून शाबासकीची थाप, कुरुंदवाडच्या पीएमश्री कुमार विद्यामंदिरला दोन कोटी पाच लाखाचा निधीआमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटीलमाझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालट

जाहिरात

 

डॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरव

schedule14 Jun 26 person by visibility 44 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांचे  दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील ज्ञान, अनुभव, नेतृत्व आणि संघटित कामकाजाची पद्धत वाखाणण्याजोगे आहे. इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदावरील त्यांच्या निवडीमुळे गोकुळचे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व अधिक भक्कम होईल आणि दुग्ध क्षेत्रातील विविध विषयांवर गोकुळची भूमिका प्रभावीपणे मांडली जाईल. त्यांची निवड म्हणजे गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरव आहे. असे उद्गार गोकुळ दूध संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांनी केले.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्यावतीने संघाचे कार्यकारी संचालक गोडबोले यांची इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या बैठकीदरम्यान  सुद्रिक यांच्या हस्ते डॉ. गोडबोले यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले, “इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल गोकुळ परिवाराने व्यक्त केलेल्या सन्मानाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. हा सन्मान माझा वैयक्तिक नसून गोकुळच्या दूध उत्पादक शेतकरी, संस्था सभासद, प्रशासकीय अधिकारी मंडळ, माजी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. भविष्यातही दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी तसेच गोकुळच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.’ याप्रसंगी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, प्रकाश आडनाईक, प्रताप पडवळ, डॉ,व्ही.डी.पाटील, डॉ.एम.पी.पाटील, एस.आर.पाटील, भरत मोळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes