शिक्षण समितीकडून शाबासकीची थाप, कुरुंदवाडच्या पीएमश्री कुमार विद्यामंदिरला दोन कोटी पाच लाखाचा निधी
schedule13 Jun 26 person by visibility 72 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने नुकतीच पीएम श्री कुमार विद्यामंदिर नंबर ३, कुरुंदवाड या शाळेला वार्षिक आढावा बैठकीनिमित्त भेट दिली. एकेकाळी कमी पटसंख्या असलेल्या या शाळेने आज घेतलेली भरारी आणि वाढलेला पट पाहून सर्व पदाधिकारी व अधिकार्यांनी शिक्षकांच्या कष्टाचे कौतुक केले.
मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांनी शिक्षण समितीच्या सदस्यांचे पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाळेची वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याचे निदर्शनास आणले. यावर शिक्षण समिती सभापती शितल यादव यांनी, या समस्येवर तात्काळ तोडगा काढत, समितीमार्फत २ कोटी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.१३ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. शाळेच्या विकासासाठी अजूनही काही निधी लागल्यास तो नक्की मंजूर केला जाईल असे सांगितले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शासकीय स्पर्धेत या शाळेने विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांचा शिक्षण समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण समितीच्या सदस्य रेखा मुगडे, सानिका आवाडे, स्नेहल वेल्हाळ, उत्तरा शिंदे, शुभांगी कुंभार,अमरसिंह चव्हाण, एकनाथ पाटील, आणि भगवान पाटील. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडकर,सुवर्णा सावंत, अनुराधा म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य प्रशांत शहापुरे उपस्थित होते.