Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण तयढघ ततचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी मंत्री चंद्रकांत पाटलांची संकल्पना, कोल्हापुरात हितैषी कौन्सिलिंग सेंटरची स्थापनानिर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत ! !केआयटीच्यावतीने नूतन कुलगुरू आर के कामत यांचे स्वागत डीवायपी पॉलिटेक्निकचा  योगेश घुले ठरला गुगल स्टुडन्ट अँबेसिडर केएमटीतील रोजंदारी - अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या : सभापती सत्यजित जाधव चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांची माघार ! तीन जागा बिनविरोध होणार!!

जाहिरात

 

मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी

schedule29 May 26 person by visibility 129 categoryलाइफस्टाइल

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : उमेदवारी अर्ज माघारीनंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील घडामोडी वेगावले आहेत. प्रभारी अध्यक्ष व समर्थ पॅनलचे प्रमुख मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल उभे ठाकले आहे. अभिनेता आनंद काळे, दिग्दर्शक सतीश रणदिवे, लेखक पितांबर काळे, निर्माते विजय शिंदे आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर आदींनी एकत्रित चित्रकर्मी पॅनल तयार केले आहे. निवडणुकीत  अपक्षांची संख्या सोळा इतकी आहे. काही जण तिसऱ्या पॅनेलची उभारणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 14 जागेसाठी निवडणूक होणार असून 44 उमेदवार रिंगणात आहेत.
 मेघराज भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलमध्ये निर्माता गटातून मेघराज भोसले, सुनील महाजन हे उमेदवार आहेत. दिग्दर्शक गटातून दीपक कदम, अजित शिरोळे, लेखन गटातून राज काजी, अभिनेता गटातून सुशांत शेलार,  छायाचित्रण गटातून धनाजी यमकर, नृत्य विभागातून सुभाष नकाशे, ध्वनिरेखन गटातून  शरद चव्हाण, कलादिग्दर्शन गटातून प्रवीण पाटील, रंगभूषा गटातून चैत्राली डोंगरे, निर्मिती व्यवस्थापक गटातून रवींद्र गावडे,  वितरण विभागातून गणेश गारगोटे आणि कामगार विभागातून विकास तोरणे हे उमेदवार आहेत
 सत्ताधारी मेघराज भोसले यांच्या विरोधात चित्रकर्मी  पॅनेल साकारले आहे. चित्रकर्मी पॅनलमध्ये निर्माता गटातून उमेदवार विजय शिंदे, गणेश तळेकर,  दिग्दर्शक गटातून विजय राणे, सतीश रणदिवे हे उमेदवार आहेत. लेखक गटातून पितांबर काळे,  अभिनेता गटातून आनंद काळे, छायाचित्रण गटातून महेश देशपांडे,  निर्मिती व्यवस्थापक गटातून मिलिंद अष्टेकर, ध्वनी यंत्रणा गटातून निलेश बुट्टे, रंगभूषा गटातून सदानंद सूर्यवंशी, प्रसिद्धी वितरण गटातून प्रकाश जाधव, नृत्यदिग्दर्शक गटातून अनिल सुतार, कला - प्रसिद्धी विभागातून सतीश बिडकर आणि कामगार गटातून रणजीत जाधव उमेदवार आहेत.
 चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीकरिता अपक्ष उमेदवारांची संख्या ही मोठी आहे काही अपक्ष एकत्र येऊन तिसरी पॅनेल  तयार करण्यासाठी  प्रयत्नशील आहेत. अपक्ष उमेदवारामध्ये निर्माता गटातून मानसिंग कदम, प्रकाश पाटील, महादेव शिरोळकर, भगवान मैदनकर  हे उमेदवार आहेत. दिग्दर्शक गटात  सुनील घोरपडे, अवधूत जोशी, अमोल भावे, अमरसिंह जगदाळे,  धर्मेद यादव,  उमेदवार आहेत. अभिनेता गटात आदित्य सिंघानिया, अशोक जाधव, संतोष शिंदे   उमेदवार आहेत.कला दिग्दर्शक गटात उल्हास भालचंद्र नांद्रे,  नृत्य दिग्दर्शक  गटात संग्राम भालकर, निर्मिती व्यवस्था –व्यवस्थापकीय यंत्रणा गटात  मनोज मराठे उमेदवार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes