Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्टकोल्हापूरकरांचा प्रवास होणार वातानुकूलित बसमधून, सुरक्षित अन् सुखकर ! केएमटीच्या ताफ्यात ई बसेस दाखल, सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत ! !३०० गर्भपात, माजी सिवहिल सर्जन पोलिसांच्या ताब्यात ! कोल्हापुरात हॉस्पिटलवर धाड !!ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडेंच्या जयंतीनिमित्त सोळांकूरमध्ये 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' शाखेचे उदघाटन शेतकरी कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांनी ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांची जयंती साजरीजिल्हा परिषद सदस्य एकवटले, अध्यक्षांना दिले निवेदन ! स्थायीच्या सदस्यांचीही साथ !!माझ्याशी वाकडं- नदीवर लाकडं ! आयुक्तांच्या विधानाची नगरसेवकांनी केली मंत्र्यांच्याकडे तक्रार !!

जाहिरात

 

केएमटी रोजंदारी कर्मचारी कायम होणार, दोन दिवसात आदेश राजेश क्षीरसागर

schedule30 Jul 26 person by visibility 97 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर केएमटीकडील १५६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या दोन दिवसात  त्यासंबंधी आदेश काढला जाईल. त्याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. गुरुपौर्णिमेदिनी आमदार क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी, केएमटी कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याबद्दल आभार मानले. केएमटीतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरू होता. अनेक वर्षे काम करुनही नोकरीत कायम न होण्याची खंत कर्मचाऱ्यांची होती. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला, त्यांना नोकरीत कायम करण्याचा आदेश दोन दिवसात मिळेल. कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला याबद्दल समाधानी आहे अशी भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes