Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्टकोल्हापूरकरांचा प्रवास होणार वातानुकूलित बसमधून, सुरक्षित अन् सुखकर ! केएमटीच्या ताफ्यात ई बसेस दाखल, सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत ! !३०० गर्भपात, माजी सिवहिल सर्जन पोलिसांच्या ताब्यात ! कोल्हापुरात हॉस्पिटलवर धाड !!ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडेंच्या जयंतीनिमित्त सोळांकूरमध्ये 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' शाखेचे उदघाटन शेतकरी कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांनी ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांची जयंती साजरीजिल्हा परिषद सदस्य एकवटले, अध्यक्षांना दिले निवेदन ! स्थायीच्या सदस्यांचीही साथ !!माझ्याशी वाकडं- नदीवर लाकडं ! आयुक्तांच्या विधानाची नगरसेवकांनी केली मंत्र्यांच्याकडे तक्रार !!

जाहिरात

 

जिल्हा परिषद सदस्य एकवटले, अध्यक्षांना दिले निवेदन ! स्थायीच्या सदस्यांचीही साथ !!

schedule30 Jul 26 person by visibility 460 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला प्राप्त संपूर्ण निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद सदस्यांना असायला हवेत अशा मागणीचे निवेदन सदस्यांनी अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांना दिले गुरुवारी 30 जुलै रोजी स्थायी समितीची बैठक होती या बैठकीदरम्यानच सर्वपक्षीय  सदस्य एकवटले आणि त्यांनी अध्यक्ष सीईओंना निधी वितरणाबाबतचे अधिकार सदस्यांना असायला हवेत या मागणीचे निवेदन दिले. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीवरून आमदाराने सदस्य यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. या निधीमध्ये आमदारानी हक्क सांगितला आहे त्याला जिल्हा परिषद सदस्यांचा विरोध आहे जिल्हा परिषद सदस्यांना हा निधी 100 टक्के जिल्हा परिषदेलाच मिळाला हवा अशी आग्रही भूमिका आहे.
  यासाठी जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष शाहू आघाडी यांच्यासह काँग्रेसने शिवसेना ठाकरे पक्षाच्या सदस्यांनी सह्यांची मोहीम राबवली होती. गुरुवारी जवळपास 50 सदस्य एकवटले आणि त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन अध्यक्ष सीईओंना दिले. या निवेदनात, '  जिल्हा वार्षिक योजनेतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीचे नियोजन हे जिल्हा परिषद सदस्यामार्फत केले जाते. जिल्हा वार्षिक योजनेतर्गत सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यता  जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या शिफारशीने करण्यासंबंधी 2025 मध्ये शासन निर्णय झाला आहे. तरी 2026-2027 या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेस प्राप्त होणारा निधी हा जिल्हयातील  खासदार, आमदार यांना देण्यात येणार असलेची बाब समजते. असे झाल्यास जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारावर त्यांचे मतदारसंघावर अन्याय होणार आहे. तरी जिल्हा परिषदेस जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त होणारा सर्व निधी हा जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्फतच वाटप करणेचे नियोजन व्हावे, ' असे निवेदनात म्हटले आहे.

सोबत जिल्हा परिषद सदस्यांचे स्वाक्षरी पत्र जोडले. शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, राजेंद्र सूर्यवंशीसागर धुंदरे, संग्राम पाटील, हामू पाटील, अनिरुद्ध रेडेकर, अर्चना चौगुलेराहुल राजीव आवळे, आतिश शिंगे, अमरसिंह हंबीरराव पाटील, अमोल चौगुले, प्रकाश मुगडे, युवराज बेलेकरआदींचा सहभाग होता. स्थायी समिती सदस्य संग्रामसिंह कुपेकर, अभिजीत तायशेटे, सुधीर देसाई, अमरसिंह यशवंतराव पाटील, डॉ. जयंत पाटील यांच्या अन्य सदस्यांनीही जिल्हा नियोजन समिती मधून आलेला निधी हा जिल्हा परिषद सदस्यांसाठी असायला हवा असे सांगितले. ते ही शिष्टमंडळात सामील झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes