कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी - रविवारी मार्गदर्शन कार्यक्रम
schedule30 Jul 26 person by visibility 23 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशन आणि वेल्थसिंकच्या संयुक्त विद्यमाने वेल्थ कॉन 2026 या मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन शनिवारी एक ऑगस्ट रोजी इचलकरंजी येथील फॉर्च्यून मल्टिप्लेक्स येथे आणि रविवारी, दोन ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापुरात हॉटेल पव्हेलियनमध्ये केले आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण ओसवाल आणि सचिव मनीष झंवर यांनी दिली. व्यवसायाच्या 'चांगल्याकडून उत्कृष्टतेकडे आणि गुंतवणूक कशी करावी या विषयावर एडलवाईस कंपनीचे अध्यक्ष आणि मँगो टाऊनचे सह संस्थापक अजय शर्मा हे पहिल्या सत्रात मार्गदर्शन करतील. आणि दुसऱ्या सत्रात मिराए ॲसेट शेरखान येथील रिटेल रिसर्च प्रमुख सोमिल मेहता हे व्यवसायातील "अस्थिरतेपलीकडील संधी " या विषयावर मार्गदर्शन करतील. कोल्हापूर देखील उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने झपाट्याने वाढत आहे. त्यात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय समोर उभे राहत आहेत. ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे.पारंपारिक गुंतवणुकीकडून लोकांचा कल हा आधुनिक गुंतवणुकीकडे वाढलेला आहे. यामध्येच लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायात गुंतवणूक करण्याकडे लोक वळत आहेत. यामध्ये गुंतवणुक फार महत्त्वाची कामगिरी बजावते. याबद्दल व्यावसायिक तसेच एकल व्यापारी आणि इतरांना देखील याचा फायदा व्हावा याकरिता अशा प्रकारच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. असे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष संदीप अथणे, सुरेश पटेल, मनोहर मगन्नेवर ,इचलकरंजी येथील प्रशांत गिरमल, अमोल शहा, मणीलाल कांगटाणी आदी उपस्थित होते.