Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्टकोल्हापूरकरांचा प्रवास होणार वातानुकूलित बसमधून, सुरक्षित अन् सुखकर ! केएमटीच्या ताफ्यात ई बसेस दाखल, सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत ! !३०० गर्भपात, माजी सिवहिल सर्जन पोलिसांच्या ताब्यात ! कोल्हापुरात हॉस्पिटलवर धाड !!ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडेंच्या जयंतीनिमित्त सोळांकूरमध्ये 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' शाखेचे उदघाटन शेतकरी कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांनी ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांची जयंती साजरीजिल्हा परिषद सदस्य एकवटले, अध्यक्षांना दिले निवेदन ! स्थायीच्या सदस्यांचीही साथ !!माझ्याशी वाकडं- नदीवर लाकडं ! आयुक्तांच्या विधानाची नगरसेवकांनी केली मंत्र्यांच्याकडे तक्रार !!

जाहिरात

 

ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडेंच्या जयंतीनिमित्त सोळांकूरमध्ये 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' शाखेचे उदघाटन

schedule30 Jul 26 person by visibility 205 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दिवंगत सचिव ज्ञानज्योती प्राचार्या  शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या ५४ व्या जयंतीचे औचित्य  साधून  संस्थेतर्फे राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल या नव्या शाखेचे उद्घाटन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम झाला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष  एम.डी.तोरस्कर,  निवास पाटील, ए बी पाटील, एस.टी. पानारी, नंदकिशोर सुर्यवंशी, के जी पाटील, केरबा पाटील,  कमलाकर पाटील, विलास  पाटील, दयानंद लोहार, मधुकर पाटील, धनाजी चौगुले, डॉ.युवराज तोरस्कर  हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कौस्तुभ  गावडे यांनी, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा व वारसा सांभाळून प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.  त्यांच्या कार्यकर्तृत्वाबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्वसुध्दा आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.’असे सांगितले. यावेळी गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले  व शाळेच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी गावडे यांनी 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' साठी दोन इंटरॲक्टिव्ह पॅनेल देण्याची व तीन वर्गखोल्यांसाठी सीलींग करण्याची घोषणा केली. मुख्याध्यापक आर.एम.कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सदाशिव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. व्ही. नारकर यांनी आभार मानले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes