माझ्याशी वाकडं- नदीवर लाकडं ! आयुक्तांच्या विधानाची नगरसेवकांनी केली मंत्र्यांच्याकडे तक्रार !!
schedule30 Jul 26 person by visibility 467 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेतील भारतीय जनता पक्षातील आवाडे व हाळवणकर गटातील वाद, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून नगरसेवकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक या घडामोडी ताज्या असतानाच गुरुवारी 30 जुलै 2026 रोजी हाळवणकर गटाच्या भाजपच्या नगरसेवकांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात भेट घेतली. यावेळी नगरसेवकांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कामकाजाविषयी तक्रारी केल्या. त्या महापालिकेशी निगडित कामकाजात नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत , सतत अपमानास्पद वागणूक देतात अशा शब्दात तक्रारींचा पाढा नगरसेवकांनी वाचला. यावर बोलताना मंत्री पाटील यांनी यासंदर्भात समन्वयाने तोडगा काढू अशी ग्वाही दिली. काही नगरसेवकांनी आयुक्तांच्या कामकाजावरुन थेट बोलले. तसेच आयुक्तांची बदली करावी अशी मागणी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी त्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतात असे नगरसेवकांना समजावले.
इचलकरंजी महापालिकेतील बावीस कोटीच्या विकास कामाच्या विषयावरून आवाडे आणि हाळवणकर गटाच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस झाली. तसेच महापालिकेच्या विकास कामासाठी दिल्या जाणाऱ्या निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांनी गुरुवारी कोल्हापुरात मंत्री पाटील यांची भेट घेतली. हॉटेल अयोध्या येथे ही भेट झाली. यावेळी नगरसेवकांनी निधी वाटपामध्ये होत असलेला दुजाभाव, आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून दिली जाणारी अपमानास्पद वागणूक या साऱ्या बाबी आक्रमकपणे मांडल्या. आयुक्त पाटील या नगरसेवक नगरसेविकासह पदाधिकाऱ्यांनाही अपमानास्पद वागणूक देतात असेही तक्रारीत म्हटले आहे. एकदा आयुक्तानी नगरसेवकांना उद्देशून ' माझ्याशी ज्यांचं वाकडं, त्यांची नदीवर लाकडं' अशी विधाने केल्याचेही नगरसेवकाने सांगितले. त्यावर मंत्री पाटील यांनी , "लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांचा मान राखण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिला जातील आयुक्त पाटील यांनाही या संदर्भात समज दिली जाईल.' असे नगरसेवकांना आश्वस्त केले. या चर्चेमध्ये इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन, तानाजी पवार, उदय बुगड, पक्षाचे सरचिटणीस शहाजी भोसले, माजी शहराध्यक्ष अमृता भोसले, उपमहापौर अनिल ढाळ्या, मनोज हिंगमिरे , रूपा बुगड, विजया महाजन, मारुती पाथरवट, जहांगीर पटेकरी, सचिन माळी, इम्रान बागवान, शशिकांत मोहिते, संग्राम स्वामी, राजू भाकरे आदी होते.
दरम्यान मंत्री पाटील यांनी नगरसेवकांना कोणताही गटतट न करता महापालिकेत काम करण्याच्या सूचना दिल्या. आवाडे आणि हळवणकर गट असा भेदभाव न करता साऱ्यांनी पक्ष म्हणून एकत्रित काम करावे. सगळ्या नगरसेवकांचा योग्य सन्मान राखला जाईल. प्रत्येकाला कामकाजात सामावून घेतले जाईल यासंदर्भात अधिकाऱ्यांनाही सूचना देऊ. संघटनात्मक पातळीवर एका समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. साऱ्यांनी एकदिलाने काम करावे. इचलकरंजी शहराचा विकास साधावा,' अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी केल्या. याप्रसंगी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर उपस्थित होते.