कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!
schedule20 Apr 26 person by visibility 165 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली परिक्षेञ येथे पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. तर कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी निलोत्पल बसू यांची बदली झाली. कोल्हापुरात बदली झालेले निलोत्पल हे गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करत होते. सातारा येथील पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. पुणे येथील पोलीस उपाधीक्षक निखिल पिंगळे यांची बदली सातारा पोलीस अधीक्षक पदी झाली आहे. गडचिरोली येथील अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश यांची बदली गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक पदी करण्यात आले आहे जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे झाली . धुळे येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची बदली पोलीस अधीक्षक जळगाव येथे झाली. पुणे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची पोलीस अधीक्षक वाशिम येथे बदली झाली. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली पोलीस उपायुक्त सुरक्षा, राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे झाली.