Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरीप्राचार्य मधुकर बाचुळकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे बुधवारी प्रकाशनशिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांचा निषेध आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावर

जाहिरात

 

गोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!

schedule20 Apr 26 person by visibility 188 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन अर्थात गोकुळच्या निवडणुकीवरून महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यातील नेते मंडळींची तोंडे वेगवेगळ्या दिशेला वळत आहेत. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पॅनेलची मागणी केली आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन गोकुळच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून पॅनेल  करावे. गोकुळच्या माध्यमातून मंत्री मुश्रीफ हे भाजपला संपवायला निघाले आहेत असा आरोप त्यांनी केला. आमदार पाटील यांनी केलेल्या विधानाला 24 तास उलटण्याअगोदरच मंत्री मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने व गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनी, " मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन  पुढाकार घेऊन राष्ट्रवादीचे मित्र पक्षांचे पॅनल तयार करावे.'' असा पलटवार केला आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादीतील वाढते अंतर हे आगामी निवडणुकीसाठी वेगळ्या राजकारणाचे मार्ग दाखवीत आहेत.
            
 " गेल्या पाच वर्षांमध्ये गोकुळ मधील सत्ताधाऱ्यांनी मोठ्या संख्येने प्राथमिक दूध संस्थांची नोंदणी केली आहे त्यामध्ये  प्रकारची नियमितता पाळली नाही. दूध संकलनाचे निकष पाळले नाहीत. या वाढीव संस्था अपात्र ठरवाव्यात. शिवाय मंत्री मुश्रीफ हे गोकुळच्या पैशातून जिल्ह्यामध्ये भाजपला संपवायचे  राजकारण करत आहेत. मंत्री मुश्रीफ यांना वगळून भाजपने पॅनेल करावे . " असे मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली त्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला.  सध्या गोकुळशी संलग्न असलेल्या जवळपास बाराशे संस्थांच्या पात्रते संदर्भातील सुनावणी सुरू आहे. गोकुळच्या राजकारणातून  भाजपमधील एक गट उघडपणे मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात  भूमिका घेत आहे .  
 या साऱ्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांचे समर्थक अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने व गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनी पत्रक परिषदेत दिले आहे त्यामध्ये म्हटले आहे "गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षांचे संयुक्त पॅनेल बनवावे. उच्च शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील  महायुतीतील नेत्यांच्या समझोत्या संदर्भात बैठका घेऊन काही नेत्यांशी चर्चा केल्याचे वृत्तपत्रांमधून वाचले. मंत्री  पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे काही नेते, आमचे नेते नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री  प्रकाश आबिटकर, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्याबरोबर चर्चा केलेल्या वृत्ताची माहिती आम्हाला मिळाली. तसेच; काही नेत्यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि विशेषता आमचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांना वगळून पॅनेल तयार करा, अशी भूमिका मांडल्याचेही खात्रीलायकरीत्या समजते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांना कळकळीची विनंती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यामध्ये सोबत येणाऱ्या मित्र पक्षांना घेऊन गोकुळ दूध संघाची ही निवडणूक लढवावी. आम्ही छातीठोकपणे सांगतो की, गोकुळ दूध संघात महायुतीचीच सत्ता येईल आणि त्या निकालाच्या रूपाने मुख्यमंत्र्यांना एक चांगली भेट देऊ. या संदर्भात यापुढे मुख्यमंत्र्यांशी कधीकाळी चर्चा होईल त्यावेळी हा मुद्दा नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी जरूर मांडावा. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावावा आणि "दूध का दूध आणि पाणी का पाणी" करून दाखवावे.  त्या माध्यमातून दूध उत्पादक हे सत्तेमध्ये असलेल्या महायुतीच्याच बाजूने आहेत, हे एकदा सिद्ध करावे"

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes