Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरीप्राचार्य मधुकर बाचुळकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे बुधवारी प्रकाशनशिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांचा निषेध आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावर

जाहिरात

 

आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळा

schedule20 Apr 26 person by visibility 277 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर :अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी, आदमापूर येथे सामुदायिक लग्नसोहळा झाला. याप्रसंगी ४१ वधू-वरांनी लग्नगाठ बांधली. अरुण डोंगळे  चॅरिटेबल ट्रस्ट व संत बाळूमामा देवालय यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळयाचे आयोजन केले होते. डोंगळे कुटुंबीय गेली १९ वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे.

या सोहळयात सहभागी वधू-वरांना सोन्याचे मणी-मंगळसूत्र, पेहराव, संसारोपयोगी भांडी संच भेट स्वरुपात देण्यात आले. शेतकरी वधूपित्यास २५ हजार रुपये व मागासवर्गीय वधूपित्यास २० हजार रुपयांचे सरकारी अनुदान मिळवून दिले जाईल असे सांगण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत,  गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक रणजीत पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रा. किसन चौगले, जिल्हा परिषद सदस्या अमृता डोंगळे, तहसिलदार अनिता देशमुख, सभापती आर. वाय. पाटील, धैयशील भोसले, रणधीर मोरे, एच. आर. पाटील, राजेंद्र भाटले, संग्राम कलिकते, संदीप डोंगळे, सम्राट डोंगळे आदी उपस्थित होत. अभिषेक डोंगळे यांनी प्रास्ताविक केले. एम. पी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुहास डोंगळे यांनी आभार मानले.  

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes