Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरीप्राचार्य मधुकर बाचुळकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे बुधवारी प्रकाशनशिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांचा निषेध आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावर

जाहिरात

 

पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

schedule20 Apr 26 person by visibility 50 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :   कोल्हापुरातील  वरिष्ठ पत्रकार समीर सुधाकर देशपांडे यांना सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. गुरूवारी 30 एप्रिल 2026  रोजी सकाळी ११.३० वाजता पुणे येथील यशदा प्रशिक्षण संस्थेमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे,  ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आमदार श्रीकांत भारतीय, आणि पदमश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. देशपांडे हे गेली ३० वर्षे पत्रकारितेमध्ये असून त्यांनी ग्रामविकासाबाबत सातत्याने लेखन केले आहे. ग्रामविकास क्षेत्रातील अनेक राज्यस्तरीय बातम्यांचा परिणामही झाला आहे.  राज्य सरकारच्या पत्रकारांसाठीच्या कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या अधिस्वीकृती विभागीय समितीचे ते अध्यक्ष आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामही उभे केले आहे. ते मुळचे आजरा तालुक्यातील चिमणे येथील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes