Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खछ थथयुवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे – प्राचार्य अभयकुमार साळुंखेशाहू महाराज हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहातस्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यापीठात तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसादबीएसएनएलकडून ग्राहककेंद्रित योजनांची घोषणा, एक रुपयांची फ्रीडम ऑफरसेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आयुब हसन मुजावर यांचे निधनन्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगावमध्ये स्वच्छता उपक्रमबँकॉकमधील हायरॉक्स स्पर्धेत कोल्हापूरच्या अक्षय मानेची दमदार कामगिरीआयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधनआता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  

जाहिरात

 

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यापीठात तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

schedule15 Aug 26 person by visibility 33 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठात देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रचंड उत्साही प्रतिसाद लाभला. कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यानंतर कुलगुरू डॉ. कामत यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून सायबर महाविद्यालयामार्गे तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक, अधिविभागांचे प्रमुख, प्रशासकीय कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान-जय किसान, जय शिवराय इत्यादी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावळीराम घाणे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. अभिजीत गाताडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, अधिसभा सदस्य विष्णू खाडे, सुरक्षा अधिकारी वसंत एकले आदी उपस्थित होते.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes