युवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे – प्राचार्य अभयकुमार साळुंखे
schedule15 Aug 26 person by visibility 27 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ स्वातंत्र्य, समता, बंधूभाव, एकसंघ राष्ट् व मानवतेचा संदेश देणाऱ्या घटनेने आपल्या देशाला सामाजिक सुरक्षितता, सहिष्णूता व स्थैर्य प्राप्त करुन दिले. आजच्या युवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे. ’असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयुकमार साळुंखे यांनी केले.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन व विवेकानंद कॉलेजमधील पुस्तक लेखक, नेट, सेट, पीएच.डी. पदवी प्राप्त् प्राध्यापकांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम झाला. विवेकानंद कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य साळुंखे बोलत होते. संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य साळुंखे म्हणाले, ‘शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन आपल्या ज्ञानाची उंची वाढवावी व चांगले विद्यार्थी घडवावेत. अन्यायाविरुध्द संघर्ष करण्याची भूमिका युवकांनी घ्यावी. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन सादर केले. वंदे मातरम, राष्ट्रीगीत व महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. तसेच नशामुक्त महाराष्ट्र होणेसाठी सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावेळी डॉ. विराज जाधव, डॉ. कैलास पाटील, डॉ.अतिश पाटील, डॉ. संजय लठ्ठे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.सी.बी.पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले
कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख प्रा.डॉ.विकास जाधव, डॉ.नम्रता नरेवाडीकर, लेफ्टनंट जे.आर.भरमगोंडा, प्रा संतोष कुंडले, डॉ.ई.बी.आळवेकर, डॉ.राजश्री पाटील, डॉ. बी. टी. दांगट, प्रा शिल्पा भोसले, प्रा. एम. आर. नवले, रजिस्ट्रार एस के धनवडे व प्रशासकीय कर्मचारी यांनी केले. यावेळी संस्था परिसरातील डॉ.बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ.बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.