न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगावमध्ये स्वच्छता उपक्रम
schedule14 Aug 26 person by visibility 363 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व उंचगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत उंचगाव येथे स्वच्छता सप्ताहा निमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या अंतर्गत महाविद्यालयाच्या डी फार्मसी व बी फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मंगेश्वर मंदिर परिसर, गाव तलाव येथे परिसराची स्वच्छता केली. लोकांमध्ये जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच परिसरात स्वच्छता न बाळगल्यास त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो. याविषयी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मधुकर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईगडे, रशीद पठाण आदी उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार, प्रा. वैशाली यादव, प्रा. काजल मोहिते, प्रा. अंजली महाडिक, प्रा. साक्षी माने, प्रा. राजेश कुलकर्णी व सीमा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.