शाहू महाराज हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
schedule15 Aug 26 person by visibility 38 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जुना बुधवार पेठ परिसरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच डॉ.दिपक साळुंखे प्राथमिक विद्यामंदिर या शैक्षणिक संकुलात देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक बी.जे.सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक, विद्या समितीचे अध्यक्ष व कोल्हापूर विभाग प्रमुख डॉ श्रीराम साळुंखे, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एस .व्ही. पोवार, माजी सहसचिव पी. एस .चव्हाण, आर. डी .पाटील , माजी मुख्याध्यापक अजित मोहिते , एस. एम .पाटील व अमित अडसुळे आदी उपस्थित होते. यानंतर ध्वजवंदन होऊन संगीत शिक्षक महेश हिरेमठ व एस.टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, राष्ट्रगीत ,ध्वजगीत, राज्यगीत व देशभक्तीपर गीतांचे गायन केले. शाळेतील आरएसपी पथकाने पाहुण्यांना मानवंदना दिली. मार्च २०२५ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, एन एम .एम .एस शिष्यवृत्तीधारक व व इयत्ता ७वी शिष्यवृत्ती परीक्षेत मधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप झाले. देशप्रेम बाळगून भारताचे भविष्य उज्वल करा असा शुभ संदेश मुख्याध्यापक सावंत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. ए. के.कांबळे यांनी सूत्रसंचालन केले