सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आयुब हसन मुजावर यांचे निधन
schedule15 Aug 26 person by visibility 81 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आयुब हसन मुजावर (वय ८७) यांचे शनिवारी (१५ ऑगस्ट २०२६ ) कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने त्यांनी शिक्षण क्षेत्रात सेवा बजावली.शिक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवा देत असताना त्यांनी अनेक पिढ्यांच्या घडवणुकीत मोलाचे योगदान दिले. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य अत्यंत मोठे व मार्गदर्शक ठरले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी,जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. ते, पन्हाळा येथील पत्रकार राजू मुजावर आणि समीर मुजावर यांचे वडील होतं.