Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दहा गावांच्या समावेशासह हद्दवाढीस सर्वांची संमती : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळडॉ.. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा कोल्हापुरात तीन एप्रिलला सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरणघोषवाक्य स्पर्धेत मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यात प्रथमजिल्हा परिषदेत शहिदांना अभिवादन कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत कृती समिती आक्रमकविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द- चिकाटी- शिस्त व आत्मविश्वास या चतुःसूत्रीचा वापर करावाहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर सामाजिक उपक्रम दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी - शरद पवार गटाचे निरीक्षक विकास लवंडेकोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढाल

जाहिरात

 

डॉ.. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा 

schedule24 Mar 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव  वाणिज्य विभाग व परभन्ना फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने  राज्यस्तरीय कार्यशाळा  झाली.  पुणे येथील ऍग्रो टुरिझमचे संचालक  गणेश चप्पलवार यांनी  मार्गदर्शन केले. कृषी पर्यटन  क्षेत्रातील भविष्यातील संधी ,अडचणी,व्यवसाय व्यवस्थापन  करण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर गोष्टींचे मार्गदर्शन व शासनाचे धोरण व सवलती, सबसीडी  मार्गदर्शन आणि  शेतीचे रूपांतर पर्यटनात करताना त्या व्यवसायाची ओळख निर्माण केली पाहिजे. प्रत्येक कृषी पर्यटन एक ब्रँन्ड म्हणून नावारूपाला कसे आणले पाहिजे. त्यासाठी शेतक-यांनी आपले बलस्थाने ओळखून उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून आपली वेगळी ओळख निर्माण करता येईन असे सांगितले. त्यासोबत प्रा. शिवकांत पुपलवाड  यांनी कृषी पर्यटन क्षेत्रातील आर्थिक बाबी येणाऱ्या अडचणी  यासंबंधी  मार्गदर्शन केले.  पन्हाळा कृषी पर्यटन केंद्र संचालक राजेंद्र सुतार यांनी कृषी पर्यटन केंद्र चालवताना येणाऱ्या संधी संबंधित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर डिसले हे होते. संस्थेचे संचालक प्रा. प्रमिला माने यांची प्रमुख उपस्थिती होती.  वाणिज्य विभाग प्रमुख  प्रा सुनीता अमृतसागर यांनी प्रास्ताविक केले.  डॉ. प्रा. सर्जेराव पद्माकर यांनी सूत्रसंचालन केले.  प्रा. शिवकांत पुपलवाड यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes