हसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर सामाजिक उपक्रम
schedule23 Mar 26 person by visibility 115 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गुरुवारी २६ मार्च रोजी वाढदिवस साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे हा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया, असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला गडहिंग्लजचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कुपेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान या बैठकीत हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर तालुकानिहाय ठरवण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन झाले.
राधानगरी- ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व गुणवंतांचा सत्कार. करवीर- मातोश्री वृद्धाश्रमात फळेवाटप व सांगवडे येथे ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप. भुयेवाडी येथे शालेय साहित्य व फळे वाटप. भुदरगड- गारगोटी येथे शालेय साहित्य वाटप, ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप व वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहभोजन. पन्हाळा- बाल संकुलामध्ये धान्य वाटप, कोडोली आरोग्य केंद्रामध्ये फळेवाटप व पोर्ले येथे फळेवाटप. गगनबावडा- कातळी येथे गरजूंना धान्यवाटप, धुंदवडे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. हातकणंगले- वडगाव उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आरोग्य शिबिर. भेंडवडे येथे शालेय साहित्याचे वाटप. इचलकरंजीतील आय. जी. एम. रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आई वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहजेवण. दक्षिण कोल्हापूर- गडमुडशिंगी येथील हॅंडीकॅप शाळेच्या मुलांना फळेवाटप. गिरगाव येथील राजर्षि शाहू महाराज वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना फळेवाटप. शिरोळ- ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप, गरजूंना धान्यवाटप व शालेय साहित्य वाटप. शाहूवाडी- बांबवडे येथे वृक्षारोपण. मलकापूर येथील अनाथ आश्रमात फळेवाटप.
माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील- बापू, केडीसीसी बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील, संचालक रणवीरसिंह गायकवाड, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, गोकुळ दूध संघाचे संचालक किसनराव चौगुले, धैर्यशील पाटील- कौलवकर, अमरसिंह माने- पाटील, बाळासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र भाटले, माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनीलराव कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजयसिंह कलिकते, करवीर तालुका अध्यक्ष शिवाजीराव देसाई, संतोष धुमाळ, संभाजी पाटील- भुयेकर आदी उपस्थित होते.जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. शिवाजीराव देसाई यांनी आभार मानले.
..........