कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत कृती समिती आक्रमक
schedule23 Mar 26 person by visibility 44 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कळंबा फिल्टर हाऊस निम्म्या कोल्हापूर शहराची तहान भागवते. गेली अनेक वर्षे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कळंबा फिल्टर हाऊसची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याबाबत बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने संस्थापक किसन कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, पद्माकर कापसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे.शुक्रवारी या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी येऊ शकले नव्हते. यावेळी बी वॉर्ड अन्याय निवड कृती समितीने इशारा देत सोमवारी अधिकारी न आल्यास टाळा ठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापूर महापालिकेचे जलअभियंता इंद्रजीत घाटगे, उप जल अभियंता रावसाहेब चव्हाण आणि कळंबा फिल्टर हाऊसचे राजेंद्र हुजरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित झाले.
प्रभागातील नगरसेवक दुर्वास कदम, सुषमा जरग, विजयसिंह खाडे पाटील, मानसी लोळगे, संतोष जरग यांचीही उपस्थिती होती. यावेळी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या सदस्यांनी जलअभियंता हर्षजित घाटगे यांना या परिसराची पाहणी केली. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे कृती समितीचे सर्वच कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी बोलताना अध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी कळंबा फिल्टर हाऊसचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ संपूर्ण दुरावस्थेचा पाढा वाचून ही दुरावस्था कधी दुर करणार?? अशी विचारणा केली. किसनराव कल्याणकर यांनी तात्काळ सुरक्षारक्षक नेमावेत अशी मागणी केली पद्माकर कापसे आणि माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी अनेक ठिकाणच्या दुरावस्था निदर्शनाला आणले. यावर जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी येत्या शुक्रवार पर्यंत डीपीआर तयार करून बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या सदस्यांना आणि प्रभागातील सर्व नगरसेवकांच्या बरोबर बैठक घेऊन तात्काळ संरक्षण भिंतीच्या जाळीचे काम सुरू केले जाईल आणि सुरक्षारक्षक नेमण्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला जाईल याची ग्वाही दिली.
सुधारणांची कामे त्वरित सुरू न झाल्यास बी वॉर्ड अन्याय निवारण समिती स्वस्थ बसणार नाही असा असा इशारा सर्व कार्यकर्त्यांनी दिला. आंदोलनामध्ये मुसाभाई शेख, किरण भोसले,सतिश पोवार,प्रशांत डकरे, दीपक म्हेतर ,रोहित गाडीवड्डर, प्रशांत बरगे, सुनील हंकारे यांचा सहभाग होता.