Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत शहिदांना अभिवादन कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत कृती समिती आक्रमकविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द- चिकाटी- शिस्त व आत्मविश्वास या चतुःसूत्रीचा वापर करावाहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर सामाजिक उपक्रम दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी - शरद पवार गटाचे निरीक्षक विकास लवंडेकोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढालहसन मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करू यागवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे- प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर गोकुळच्या दुधाची विक्रमी विक्री, गुढीपाडवा-रमजान ईदला मिळून 43 लाख लिटरची विक्री जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेश

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत शहिदांना अभिवादन

schedule23 Mar 26 person by visibility 74 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन : जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे सोमवारी 23 मार्च रोजी वाजता शहिद दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले.
 जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते प्रमुख पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या धैर्य, त्याग व देशभक्तीची गाथा उपस्थितांसमोर उलगडून सांगितली. त्यांनी सांगितले की, या महान क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान सदैव प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  अर्जुन गोळे, महिला व बालकल्याण जिल्हा  कार्यक्रम अधिकारी  नितिन मस्के, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी   मिना शेंडकर, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी  अरुणा हसबे,  लेखाधिकारी अनिकेत गावडे (लेखाधिकारी), सहायक गट विकास अधिकारी अविनाश मेश्राम आदींनी  शहीदांना आदरांजली अर्पण केली. मेन राजाराम हायस्कूलमधील अध्यापिका  सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes