दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी - शरद पवार गटाचे निरीक्षक विकास लवंडे
schedule22 Mar 26 person by visibility 54 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन : " राष्ट्रवादीचे दोन पक्ष एकत्र करण्याच्या प्रक्रियेमुळे थोडा गोंधळ झाला परंतु आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नसल्यामुळे एकत्रित करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पक्षासाठी पुन्हा एकदा जोमाने काम करण्यासंदर्भामध्ये सक्त आदेश आले आहेत त्यामुळे उत्तर व दक्षिण यापैकी एका मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून काम करा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निरीक्षक विकास लवंडे यांनी केल्या. कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
सरचिटणीस गणेश जाधव यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष आर के पोवार यांनी शहरांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीचा अहवाल सादर केला. प्रदेश राष्ट्रवादीकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य झाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी पद्मजा तिवले यांनी पक्ष स्थापनेपासून आम्ही काम करतो आहोत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता परंतु प्रत्येक वेळेला पक्ष आमचा विचार करत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. याप्रसंगी निरंजन कदम, लक्ष्मण करपे फिरोज सरगुर, पल्लवी भोसले, गणेश नलवडे, शशिकांत कदम यांनी आपले मत व्यक्त केले.
या बैठकीनंतर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद बाबत आपले कार्यकर्ते विविध पक्षात जाऊन निवडून आले असून आता पुन्हा त्यांना आपल्या पक्षात काम करतील किंवा नाही याबाबत त्यांना विचारावे लागेल. पुन्हा जिल्ह्याची नवीन कार्यकारणी ज्या ज्या ठिकाणी राजीनामे दिले आहेत त्या ठिकाणी नियुक्ती करावी लागते असे सांगितले यावेळी हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांनी आम्ही शरद पवार यांचे कार्यकर्ते आहोत परंतु पक्षाने ही भूमिका घ्यावी घ्यावी असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी पुन्हा पक्ष उभा करण्याचे आव्हान आमच्यासमोर असून आम्ही ते प्रामाणिकपणे पार पडून असे सांगितले युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, संतोष मेंगाने, रोहित पवार, महिलांचे जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, वसंतराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. लवकरच जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली 15 एप्रिल 2026 नंतर जिल्ह्याची व्यापक बैठक घेतली जाईल असे सांगितले.