शाहूवाडीत काँग्रेसला धक्का, करणसिंह गायकवाड करणार जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश
schedule22 Jul 26 person by visibility 284 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील काँग्रेसचे नेते व गोकुळचे माजी संचालक करणसिंह गायकवाड हे बुधवारी 22 जुलै 2026 रोजी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करणार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक नेते व आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी चार वाजता वारणानगर येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. गायकवाड हे गेली दहा वर्षे जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्यासोबत काम करत आहेत. शाहूवाडी तालुक्यातील स्थानिक राजकारणात ते आणि कोरे एकत्र आहेत. गायकवाड हे काँग्रेसचे आहेत मात्र स्थानिक राजकारणात त्यांची सोबत कोरे यांना आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक नजीकच्या काळात होत आहे. या निवडणुकीत प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे यामध्ये ठराव तारकांची संख्या ही जमिनीची बाजू ठरत आहे जास्तीत जास्त ठराव तारक आपल्या बाजूने आहेत हे दाखविण्यासाठी नेते मंडळी प्रयत्नशील आहेत पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील राजकारणात गायकवाड यांना मानणारा एक गट आहे शिवाय गायकवाड हे गोकुळचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. ते , माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांचे पुत्र आहेत.