राज्य सरकारमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू - आमदार राजेश क्षीरसागर
schedule22 Jul 26 person by visibility 82 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील जनतेला दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर त्याचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तर माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले होते. व्यासपीठावर महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त,करवीर तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हा भूमी अधीक्षक शिवाजी भोसले,सहायक आयुक्त स्वाती दुधाने, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख विजय जाधव, महेश जाधव, आदी उपस्थित होते.
क्षीरसागर पुढे म्हणाले ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे लोकाभिमुख तसेच विकासाभिमुख नेतृत्वामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे .त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे.भविष्यात लवकरच कोल्हापूरची हद्दवाढ होईल असे सांगून त्यांनी यावेळेस स्वर्गीय अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. सेवा - समाधान शिबिराचे येत्या 2 ऑगस्ट पर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे ठीक - ठिकाणी आयोजन सुरू राहील असे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी सांगितले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महाराजस्व समाधान शिबीराच्या अनुषंगाने दुरदृष्यप्रणालीद्वारे आपला संदेश उपस्थितांना दिला.
जिल्ह्यातील प्रत्येक भूमिधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातर्फे नियोजन केले जाईल असे शिवाजी भोसले यांनी सांगितले तर जिल्हा प्रशासन व मनपातर्फे या शिबिरात सुमारे तेरा हजाराहून अधिक दाखले वाटपाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती करवीर प्रांतधिकारी मोसमी चौगुले यांनी प्रास्ताविकात दिली. उपायुक्त परितोष कंकाळ यांनी केले