Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हंगामा, सदस्यांकडून अधिकारी सभेतून ‘आऊट’गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे : वंचित - डाव्या आघाडीचे आवाहनजिल्हा परिषदेत अजित पवार यांची जयंती साजरीराज्य सरकारमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू - आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात चार ऑगस्टला राज्यव्यापी व्यापारी परिषद, सेस रद्दसाठी ठरणार आंदोलनाची दिशाशाहूवाडीत काँग्रेसला धक्का, करणसिंह गायकवाड करणार जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन, 25 इतिहास अभ्यासक - संशोधकांचा सहभाग पीएचडी विद्यार्थ्यांचे अर्धशतक ! डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडले पन्नास संशोधक !!महापालिका अधिकाऱ्यांची कमाल, टाकावूतून टिकाऊ !  भंगारातील आरसी वाहनांचे ट्रकमध्ये रुपांतर ! !शिवकाळातील इतिहासाला वंदन करत सह्याद्री प्रतिष्ठानची पदभ्रमंती मोहीम, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जाहिरात

 

कोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन, 25 इतिहास अभ्यासक - संशोधकांचा सहभाग

schedule22 Jul 26 person by visibility 66 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राजर्षी शाह महाराजांच्या जीवन चरित्रावर संशोधन, अभ्यास  करत असलेल्या कोल्हापुरातील  शाहू अभ्यासक, संशोधकांच्या उपस्थितीमध्ये रविवारी 26 जुलै 2026 रोजी 'राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन' आयोजित केले आहे. अशी माहिती  राजर्षी शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक व सहनिमंत्रक बबनराव रानगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या सभागृहात सायंकाळी  5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनामध्ये इतिहास संशोधक डॉ. भाऊसाहेब खणे, डॉ. रमेश जाधव, डॉ. विलास पवार, डॉ. टी एस पाटील, डॉ. ए एम वैराट, इंद्रजीत सावंत, डॉ. जे के पवार , डॉ. पद्मा पाटील, श्रीराम पचिद्रें, गणेशकुमार खोडके, डॉ. अरुण शिंदे, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. गिरीश मोरे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. संभाजी बिरंजे, डॉ. कपिल राजहंस, डॉ. वसंतराव भागवत, चंद्रकांत पाटील, स्वप्नजा घाटगे, सुनील माने, उमेश सूर्यवंशी, राम यादव, अमित अडसुळे, विक्रम रेपे, संदीप मगदूम, शाहीर विजय शिंदे यांना निमंत्रित केले आहे. या संमेलनात राजर्षी शाहू महाराजांचे कार्य व विचारांचे जतन -संवर्धन ताकतीने होण्यासाठी चर्चा होणार आहे अशी माहिती मुळीक व  रानगे यांनी दिली. पत्रकार परिषदेला संजय कांबळे, डी.जी. भास्कर, शशिकांत पाटील, विजय पाटील, सोमनाथ घोडेराव, शिवमुर्ती झगडे, बबन शिंदे, प्रताप नाईक, संदेश माने, नकुल पाटील, कादर मलबारी आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes